Advertisement

शिवराय-युवराज यांची पन्हाळगडावरील ऐतिहासिक भेट

दिलेर खानाच्या छावणीतून निघाल्यानंतर तब्बल तीन वर्षांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि युवराज शंभूराजे या पितापुत्रांची भेट पन्हाळगडावर घडली होती. त्या दोघांच्याच आयुष्यातील नव्हे, तर शिवकालीन इतिहासातील एक महत्त्वपूर्ण घटना म्हणून या भेटीचा उल्लेख केला जातो.

शिवराय-युवराज यांची पन्हाळगडावरील ऐतिहासिक भेट
SHARES

छत्रपती शिवाजी महाराजांनी जगातील पहिल्या लोकाभिमुख स्वराज्याची स्थापना केली. शून्यातून स्वराज्य निर्माण करणं हे सहज शक्य नव्हतं, पण त्याहून कठीण होतं ते निर्माण केलेलं स्वराज्य टिकवणं, वाढवणं. छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांच्या मर्द मावळ्यांनी हे आव्हान स्वीकारलं आणि सक्षमपणे पेललं.



खरा इतिहास लोकांसमोर 

संभाजी महाराजांबद्दल आजवर अनेकदा इतिहासकारांकडून, बखरकारांकडून अनेक कथा रंगवल्या गेल्या आहेत. पण त्या सगळ्या गोष्टींमागचा खरा इतिहास लोकांसमोर आणण्याचं काम झी मराठीवरील ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही मलिका करत आहे. शिवाजी महाराजांच्या भूमिकेत शंतनू मोघे आणि संभाजी महाराजांच्या भूमिकेत डॉ. अमोल कोल्हे यांनी या दोन्ही व्यक्तिरेखा उत्तमरित्या साकारल्या आहेत. प्रेक्षकांचाही या मालिकेला उदंड प्रतिसाद मिळत आहे.


शेवटची भेट 

संभाजी महाराजांच्या आयुष्यातील एक महत्त्वपूर्ण प्रसंग आता या मालिकेतून समोर येणार आहे. दिलेर खानाच्या छावणीतून निघाल्यानंतर तब्बल तीन वर्षांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि युवराज शंभूराजे या पितापुत्रांची भेट पन्हाळगडावर घडली होती. त्या दोघांच्याच आयुष्यातील नव्हे, तर शिवकालीन इतिहासातील एक महत्त्वपूर्ण घटना म्हणून या भेटीचा उल्लेख केला जातो. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या आयुष्यातील ही शेवटची भेट असल्याने ती जेवढी राजकीयदृष्ट्या महत्त्वाची होती तेवढीच भावनिक दृष्ट्याही महत्त्वाची होती. लवकरच ही ऐतिहासिक घटना आपल्याला ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतून पाहायला मिळणार आहे.  


कोणती नवी दिशा? 

या भेटीत शिवाजी महाराज आणि शंभूराजे यांच्यात काय चर्चा होणार? सोयराबाई संभाजी महाराजांना स्वीकारणार का? यापुढे दिल्ली आणि रायगडावरच्या राजकारणाला कोणती नवी दिशा मिळणार? आनाजी दत्तोंची या सगळ्यात काय भूमिका असेल? हे सगळं जाणून घेण्याची आणि पन्हाळगडावरील या ऐतिहासिक भेटीचे साक्षीदार होण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.



हेही वाचा - 

#MeToo: बदनामी सहन न झाल्याने आत्महत्येचा प्रयत्न

#MeToo: माझ्यावर कारवाई करू नका, आलोकनाथ यांचं 'सिन्टा'ला साकडं




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा