Advertisement

कपिल शर्माची पत्रकाराविरोधात तक्रार

कपिल शर्माने ६ एप्रिल रोजी त्याचे वकिल तनवीर निझाम यांच्यामार्फत ओशिवरा पोलिस ठाण्यात विकी यांच्या विरोधात तक्रार नोंदवली. याबाबतचं ट्विट कपिलने केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

कपिल शर्माची पत्रकाराविरोधात तक्रार
SHARES

अभिनेता कपिल शर्माने आपल्याला एका पत्रकाराने शिवीगाळ व खंडणीसाठी फोन केल्याचा आरोप करत ओशिवरा पोलिस ठाण्यात वकिलामार्फत तक्रार नोंदवली आहे. या तक्रारीत त्याने आपल्याला विकी लालवाणी या पत्रकाराने फोन करून तसंच ट्विटरच्या माध्यमातून धमकावल्याचं म्हटलं आहे. यासोबत कपिलने 'द काॅमेडी नाइट विथ कपिल' शो च्या निर्मात्या निती आणि प्रिती सीमोन यांच्याविरोधातही तक्रार नोंदवली आहे. सध्या कपिल 'फॅमिली टाइम विथ कपिल' हा शो चालत नसल्यामुळेही त्रस्त असल्याचं म्हटलं जात आहे. 


कुणाविरोधात तक्रार?

या ना त्या कारणाने स्वत: वर कायम वाद ओढावून घेत चर्चेत राहणाऱ्या कपिल शर्माने पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला आहे. कपिलने ‘स्पाॅट बाॅय इ.’ या मीडिया कंपनीचे प्रमुख विकी लालवणी यांच्या विरोधात मानसिक छळ आणि खंडणीची तक्रार नोंदवली आहे. 


काय आहे तक्रारीत?

या तक्रारीत कपिलने ''मागील अनेक दिवसांपासून विकी माझा पाठलाग करत असून माझ्या प्रत्येक खासगी आयुष्यावर लक्ष आहेत. शिवाय आपल्या ‘स्पाॅट बाॅय इ.’ या वेबपोर्टलवर माझ्या विरोधात लिहित आहे. माझ्याविरोधात न लिहिण्यासाठी त्यांनी माझ्याकडे २५ लाख रुपयांची खंडणी मागितली,'' असा आरोप देखील कपिलने केला आहे.


कपिलचा जबाब नोंदवणार

या प्रकरणी कपिल शर्माने ६ एप्रिल रोजी त्याचे वकिल तनवीर निझाम यांच्यामार्फत ओशिवरा पोलिस ठाण्यात विकी यांच्या विरोधात तक्रार नोंदवली. याबाबतचं ट्विट कपिलने केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. तक्रारीनुसार कपिलशी संपर्क साधून त्याचा जबाब नोंदवून पुढील कारवाई करण्यात येईल, असं ओशिवरा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुभाष खानविलकर यांनी सांगितलं.



हेही वाचा-

सुनीलच्या शोचा 'दे दना दन' फर्स्ट लूक!

'माझ्या कुटुंबियांनीच माझा छळ केला', कॉमेडियन सिद्धार्थचा इन्स्टाग्रामवर खुलासा



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा