Advertisement

सुनीलच्या शोचा 'दे दना दन' फर्स्ट लूक!

सुनील 'अंगूरी भाभी' म्हणून प्रेक्षकांच्या मनात घर केलेली अभिनेत्री, बिग बॉस ११ ची विजेती शिल्पा शिंदेबरोबर एका नवीन शो मध्ये दिसणार आहे. 'दे दना दन' या वेब शोमधून हे दोघं प्रेक्षकांसमोर येणार आहेत. या वेब शोचा फर्स्ट लुक शिल्पाने प्रेक्षकांसाठी शेअर केला आहे.

सुनीलच्या शोचा 'दे दना दन' फर्स्ट लूक!
SHARES

सुनील ग्रोवर आणि कपिल शर्मा यांच्यातलं तू तू मै मै सगळ्यांनाच माहीत आहे. त्यामुळे कपिलच्या नवीन शोमध्ये सुनील दिसला नाही. पण लवकरच सुनील 'अंगूरी भाभी' म्हणून प्रेक्षकांच्या मनात घर केलेली अभिनेत्री, बिग बॉस ११ ची विजेती शिल्पा शिंदेबरोबर एका नवीन शो मध्ये दिसणार आहे. 'दे दना दन' या वेब शोमधून हे दोघं प्रेक्षकांसमोर येणार आहेत. या वेब शोचा फर्स्ट लुक शिल्पाने प्रेक्षकांसाठी शेअर केला आहे.


 


शोचा फर्स्ट लूक शेअर करताना शिल्पाने सुंदर कॅप्शनही दिलं आहे. शिल्पा म्हणते, येत्या काळात सर्वांच्याच चेहऱ्यावर आम्ही दोघंही हसू आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. ज्यात आम्हाला यश मिळेल, अशी मला आशा आहे.

सध्या टीव्हीच्या राज्यात वेब शोचं प्रस्थ वाढत आहे. अनेक स्टार वेब सिरीजकडे वळले आहेत. यामध्ये आता शिल्पा आणि सुनीलच्या शोचा कस लागणार आहे. जिओ टीव्ही अॅपवर आयपीएल सामन्यांदरम्यान शुक्रवार ते रविवारदरम्यान प्रसारित होणार आहे. या कार्यक्रमात अली असगर, सुगंधा मिश्रा, परेश गणात्रा हे कलाकार झळकणार आहेत.

शिल्पाच्या या पोस्टनंतर त्या दोघांच्या लुकची चर्चा रंगली आहे. सुनील आणि शिल्पाचा फोटो चांगलाच लक्षवेधी ठरत आहे. पण त्यांच्या या फोटोतील जादू शो मध्ये किती चालते हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.



हेही वाचा

सुनीलला होती कपिलच्या फोनची प्रतीक्षा, आता दुसरा शो केला साईन


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा