विनय आपटेंच्या स्मृतींना उजाळा

विले पार्ले - ज्येष्ठ अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक विनय आपटे यांच्या तिसऱ्या स्मृतीदिनानिमित्त विले पार्ले येथील साठे महाविद्यालयात परिसंवाद झाला. नव्या अर्थनीतीमुळे सिनेसृष्टीपुढे उभी ठाकलेली आव्हानं, हा परिसंवादाचा विषय होता. या विषयावर या वेळी सखोल चर्चा करण्यात आली. अॅडगुरू भरत दाभोळकरही परिसंवादात सहभागी झाले. विनय आपटे यांच्या आठवणीनांही या परिसंवादात उजाळा मिळाला. नोटबंदीमुळे अनेक चित्रपटांच्या डिसेंबरमधल्या रिलीज डेट्स पुढे ढकलण्यात आल्या आहेत. चित्रपट, नाटक वा नव्या मालिकाही या परिस्थितीत लांबणीवर जाण्याची भीती या वेळी व्यक्त झाली. 

Loading Comments