Advertisement

अभिनेत्री ईशा देओल-तख्तानीने दिला चिमुकलीला जन्म!


अभिनेत्री ईशा देओल-तख्तानीने दिला चिमुकलीला जन्म!
SHARES

बॉलिवूडची ड्रीम गर्ल हेमा मालिनी आणि धर्मेंद्र पुन्हा एकदा आजी आजोबा झाले आहेत. त्यांची मुलगी इशा देओल-तख्तानीनं सोमवारी एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. ईशाला हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

भरत तख्तानी यांनं मीडियाशी बोलताना सांगितलं की, 'मी खूप खूश आहे. मुलगी दिसायला माझ्यासारखीच आहे. माझा आनंद मी शब्दांमध्ये व्यक्त करू शकत नाही.'


सौजन्य

याच वर्षी एप्रिल महिन्यात इशानं गरोदर असल्याची गोड बातमी दिली होती. ईशानं आपल्या फॅमिली मेंबर्ससोबत प्रेग्नन्सीचा काळ चांगलाच एन्जॉय केला. याचे बरेच फोटो ईशानं सोशल मीडियावर शेअर केले. हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्यासोबत तिनं खास फोटोशूटही केलं होतं. याचे देखील फोटो वेळोवेळी ती सोशल मीडियावर अपडेट करत होती.


सौजन्य

अनेक वर्ष डेट केल्यानंतर ईशानं २൦१२ मध्ये भरत तख्तानीसोबत लग्न केलं. लग्नानंतरही ईशानं काही चित्रपटात काम केलं. पण २൦१५ पासून ती रुपेरी पडद्यापासून लांब राहिली आहे.



हेही वाचा

'पद्मावती'साठी वापरलं 400 किलो सोनं!


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा