Advertisement

सावधान! राजनंदिनी येतेय!

ईशाला विक्रांतचं सत्य देखील कळालं. विक्रांतच गजा पाटील आहे हे कळल्यावर ईशाला खूप मोठा धक्का बसला. ईशाला या सगळ्यातून फक्त राजनंदिनीच मार्ग दाखवू शकते. त्यामुळंच विक्रांतची पहिली पत्नी राजनंदिनीची मालिकेत एण्ट्री कधी होणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.

सावधान! राजनंदिनी येतेय!
SHARES

एका मागोमाग एक नाट्यमय वळणं घेत समोर येणाऱ्या कथानकामुळं 'तुला पाहते रे' ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. पहिल्या भागापासून निर्माण झालेलं या मालिकेचं आकर्षण दिवसेंदिवस वाढतच आहे. अशातच सोशल मीडियावर पसरणाऱ्या इशाच विक्रांतची हत्या करणार अशा बातम्यांमुळं 'तुला पाहते रे'कडे प्रेक्षकांचा ओढा अधिकच वाढत आहे. आता यात राजनंदिनीचीही भर पडली आहे.


राजनंदिनीच्या एण्ट्रीची उत्सुकता

झी मराठी वाहिनीवर प्रसारीत होणाऱ्या 'तुला पाहते रे' या मालिकेत दररोज नवनवीन ट्विस्ट येत आहेत. मालिकेचं उत्तम कथानक आणि कलाकारांचं अभिनय या गोष्टींमुळे ही मालिका प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. विक्रांत सरंजामे आणि इशा निमकर यांच्या लग्नानंतर मालिकेत बऱ्याच नवीन घडामोडी पाहायला मिळाल्या. ईशाला विक्रांतचं सत्य देखील कळालं. विक्रांतच गजा पाटील आहे हे कळल्यावर ईशाला खूप मोठा धक्का बसला. ईशाला या सगळ्यातून फक्त राजनंदिनीच मार्ग दाखवू शकते. त्यामुळंच विक्रांतची पहिली पत्नी राजनंदिनीची मालिकेत एण्ट्री कधी होणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.


कथेचा उलगडा

आता यात फार वेळ दवडला जाणार नसल्याची माहिती मिळाली आहे. लवकरच प्रेक्षकांना मालिकेत राजनंदिनीची एंट्री होणार आहे. शिल्पा तुळसकर राजनंदिनीची भूमिका साकारणार आहे. शिल्पसोबत मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवातही करणत आली आहे. राजनंदिनीच्या एंट्रीबद्दल शिल्पा म्हणाली की, आतापर्यंत प्रेक्षकांनी या मालिकेवर खूप प्रेम केलं आहे. मी लवकरच राजनंदिनीच्या भूमिकेत प्रेक्षकांना मालिकेत दिसेन.  त्यामुळं विक्रांतचं सत्य, विक्रांत आणि राजनंदिनीची केमिस्ट्री आणि पुढील कथेचा उलगडा कसा होतो हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांनी न विसरता मालिका पाहत राहावी असं मी आवाहन करते.


बंद खोलीचं रहस्य

शिल्पानं आजवर नेहमीच विविधांगी भूमिकांना प्राधान्य दिलं आहे. छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंत आणि मराठी सिनेसृष्टीपासून हिंदी चित्रपटांपर्यंत शिल्पा तुळसकर या नावाची एक वेगळी ओळख आहे. शिल्पाची हीच ओळख राजनंदिनीलाही लोकप्रिय बनण्याच उपयोगी ठरणार आहे. 'तुला पाहते रे' मालिकेच्या शीर्षकगीतात शिल्पाची झलक पाहायला मिळते, पण आता राजनंदिनीचं रहस्य काय आहे, तिच्यासोबत काय घडलंय, बंद खोलीचं काय रहस्य आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळण्यासाठी प्रेक्षकांना जास्त वेळ वाट पाहावी लागणार नाही हे खरं.




हेही वाचा -

'रंपाट'मधील कोल्हापूरची मुन्नी पाहिली का?

संधू-अमरनाथ करणार इतिहासाची पुनरावृत्ती!




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा