राज ठाकरेंच्या भेटीला ‘इपितर’ सिनेमाची टीम


SHARE

मराठी माणसाचा आवाज बुलंद करण्यासाठी कायम झटणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची ‘इपितर’ या आगामी सिनेमाच्या टीमनं भेट घेतली. परश्या, बॉब्या आणि आर्थिंग्या या तीन इरसाल मित्रांची कथा ‘इपितर’ सिनेमात पाहायला मिळणार आहे. डॉ. सोनाली पाटील रॉय आणि डॉ. संदीप सत्यदेव रॉय प्रस्तुत ‘इपितर’ सिनेमाची निर्मिती किरण बेरड आणि नितीन कल्हापुरे यांनी केली आहे. दत्ता तारडे या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत. या सिनेमाच्या टीमने राज ठाकरे यांची भेट घेऊन सिनेमाची माहिती देणारं पोस्टर-ब्रोशर दिलं.


राज यांचा कलाक्षेत्रातही वावर

ठाकरे यांच्या भेटीविषयी निर्माते किरण बेरड म्हणाले की, राज ठाकरे यांचा सामाजिक क्षेत्रात जसा वावर असतो, तेवढाच कलाक्षेत्रातही वावर असतो. ते कलेची उत्तम जाण असलेले नेते आहेत. त्यामुळे त्यांना आमच्या सिनेमाचं पोस्टर भेट द्यावं अशी इच्छा होती. यावेळी झालेल्या भेटीत त्यांनी सिनेमाविषयी आत्मियतेनं चर्चा केली.


१३ जुलैला प्रदर्शन

सुधीर बोरूडे, दत्ता तारडे आणि विकास इंगळे यांची सहनिर्मिती असलेल्या या विनोदी सिनेमाचं लेखन किरण बेरड यांनी केलं आहे. भारत गणेशपुरे ,मिलिंद शिंदे, प्रकाश धोत्रे, जयेश चव्हाण, विजय गीते, गणेश खाडे, निकिता सुखदेव, वृंदा बाळ आणि सुहास दुधाडे यांच्या भूमिका असलेला ‘इपितर’ १३ जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात झळकणार आहे.


हेही वाचा -

चांगलं-वाईट समजण्याच्या वयातील ‘यंग्राड’ मुलांची गोष्ट

मेघडंबरीतील 'सेल्फी' भोवली, रितेशला मागावी लागली माफीसंबंधित विषय
ताज्या बातम्या