Advertisement

इट्स 'अ डॉट कॉम मॉम' !


इट्स 'अ डॉट कॉम मॉम' !
SHARES

'लावणी' या लोककलेला जागतिक स्तरावर स्थान मिळवून देणाऱ्या आणि मराठी नाट्यसृष्टीत प्रसिद्ध असलेल्या डॉ. मीना नेरूरकर आता 'अ डॉट कॉम मॉम' या सिनेमाद्वारे चित्रपट सृष्टीत पदार्पण करत आहेत.त्या भारतातल्या प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाल्या आहेत. मीना ताई आधी मुंबईतल्या दादर शिवाजी पार्क राहत होत्या. अमेरिकेत चित्रित करण्यात आलेल्या या सिनेमाची निर्मिती, लेखन आणि दिग्दर्शन त्यांनीच केले आहे. यासोबतच सिनेमाची उत्तम कोरिओग्राफीसुद्धा त्यांनी केली आहे. या सिनेमात त्यांनी आई आणि मुलाच्या नात्यातील भावनिक गुंफण दाखवली आहे. टेक्नोसॅव्ही जगात साध्या भोळ्या आईची वेगवेगळी रूपे या सिनेमाच्या माध्यमातून दाखवण्यात आली आहे. हा सिनेमा येत्या ३० सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'सुंदरा मनामध्ये भरली' तसेच 'अवघा रंग एकचि झाला' यांसारखे अनेक दर्जेदार नाटके डॉ. नेरूरकर यांनी प्रेक्षकांसमोर सादर केली आहेत. या दोन्ही नाटकांना प्रेक्षकांनी हाऊसफुल्ल प्रतिसाद दिला. 'अ डाॅट काॅम माॅम' हा त्यांनी दिग्दर्शित केलेला पहिलाच सिनेमा आहे. गेली अनेक वर्ष त्यांनी रविवारच्या सामना या दैनिकात तर लोकप्रभा या मासिकात लिखाण केले. तसेच 'धन्य ती गायनॅक कला' आणि 'ठसे माणसांचे' यांसारखी पुस्तकेही लिहिली. गेल्या ४० वर्षाच्या अमेरिकेतल्या वास्तव्यात त्यांनी 'वाऱ्यावरची वरात', 'विच्छा माझी पुरी करा', 'सख्खे शेजारी' यांसारख्या नाटकातही कामे केली आहेत.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा