Advertisement

सोशल मीडियावर अवतरली ‘माधुरी’

रुपेरी पडद्यावर लवकरच ‘माधुरी’ अवतरणार असल्याची बातमी आम्ही काही दिवसांपूर्वीच दिली होती. नुकतंच या चित्रपटाचं पहिलं पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आलं आहे.

सोशल मीडियावर अवतरली ‘माधुरी’
SHARES

रुपेरी पडद्यावर लवकरच ‘माधुरी’ अवतरणार असल्याची बातमी आम्ही काही दिवसांपूर्वीच दिली होती. नुकतंच या चित्रपटाचं पहिलं पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आलं आहे.


सोनालीची प्रमुख भूमिकेत

मुंबापुरी प्रॉडक्शनचे मोहसिन अख्तर यांनी काही दिवसांपूर्वीच ‘माधुरी’ या आगामी मराठी चित्रपटाची घोषणा केली होती. मोहसिन अख्तर निर्मित ‘माधुरी’ या चित्रपटात मराठी चित्रपट रसिकांची लाडकी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. सोनालीने आजवर नेहमीच एकापेक्षा एक अप्रतिम भूमिका साकारुन प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे, त्यामुळेच ‘माधुरी’मधील सोनालीची भूमिका पाहण्यासाठी तिचे चाहते नक्कीच उत्सुक असतील.


शरद केळकर नवीन रुपात

एका अनमोल आणि सुंदर नात्यावर गुंफलेल्या ‘माधुरी’ या चित्रपटात सोनालीसह अभिनेता शरद केळकर देखील महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. हँडसम हंक असलेला शरद यावेळी मात्र कधीही न पाहिलेल्या एका नवीन रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सोनाली आणि शरद यांच्यासोबतीला मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना संहिता जोशी हा एक नवा चेहरा पाहायला मिळणार आहे.


‘वय विचारू नका!’

‘माधुरी’ या टायटलला ‘वय विचारू नका!’ अशी कुतूहल वाढवणारी टॅगलाईन देण्यात आली आहे. स्वप्ना वाघमारे जोशी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. स्वप्ना यांनी शिरीष लाटकर आणि समीर अरोरा यांच्या साथीने या चित्रपटाची कथाही लिहीली आहे. पटकथा शिरीष लाटकर आणि समीर अरोरा यांची आहे, तर संवाद केवळ लाटकर यांनी लिहिले आहेत. प्रसाद भेंडेने या चित्रपटाचं छायांकन केलं आहे. ३० नोव्हेंबरला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाला अवधूत गुप्तेने संगीत दिलं आहे.


हेही वाचा - 

शिवराय-युवराज यांची पन्हाळगडावरील ऐतिहासिक भेट

#MeToo: बदनामी सहन न झाल्याने आत्महत्येचा प्रयत्न

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा