Advertisement

यशवंत चित्रपट महोत्सव 20 जानेवारीपासून


यशवंत चित्रपट महोत्सव 20 जानेवारीपासून
SHARES

नरिमन पॉइंट - यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, पुणे फिल्म फाउंडेशन, मुंबई विद्यापीठ यांच्या वतीनं आणि महाराष्ट्र शासनाच्या सहकार्यानं, यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. हा महोत्सव 20 ते 26 जानेवारी दरम्यान होईल. महोत्सवाचं उद् घाटन प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत होईल, अशी घोषणा महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी पत्रकार परिषदेत केली.

यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं हे सातवं वर्ष आहे. यंदा महोत्सवाला मुंबई विद्यापिठाचंही सहकार्य लाभणार आहे. कुलगुरू डॉ. संजय देशमुखही उद् घाटन समारंभाला उपस्थित राहणार आहेत. यंदाच्या महोत्सवात जगभरातले ७५ सिनेमे दाखवले जाणार आहेत. तसंच, यावर्षी स्मिता पाटील स्मृती व्याख्यानमालेस प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर व्याख्याते असतील. मास्टर क्लास या विभागात चिली देशातील प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक जॉर्ज अरिगडा हे ध्वनि आणि संगीत या विषयावर कार्यशाळा घेणार आहेत, अशी माहिती डॉ. जब्बार पटेल यांनी दिली.
यावर्षी 52 जागतिक, 3 भारतीय, 3 मराठी, 4 रेट्रो, 7 लॅटिन अमेरिकन सिनेमे आहेत. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या 29 लघुपटांत 13 मुव्ही तर 16 अॅनिमेशन फिल्म आहेत आहे. यावर्षी व्हिएतनामचे 5 सिनेमेही दाखवणार असल्याचं महोत्सवाचे मुख्य समन्वयक महेंद्र तेरेदेसाई यांनी सांगितलं. या वेळी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे सरचिटणीस शरद काळे, महोत्सवाचे मुख्य समन्वयक महेंद्र तेरेदेसाई, आस्थापना व्यवस्थापक संजय बनसोडे आदीही उपस्थित होते.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा