Advertisement

'महाभारत'मध्ये शकुनी मामाची भूमिका करणारे गुफी पेंटल यांचे निधन

गुफी पेंटल यांचे दीर्घ आजाराने निधन झाले.

'महाभारत'मध्ये शकुनी मामाची भूमिका करणारे गुफी पेंटल यांचे निधन
SHARES

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'महाभारत'मध्ये शकुनी मामाची भूमिका साकारणाऱ्या गुफी पेंटल यांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

ते बराच काळ आजाराने त्रस्त होता आणि त्यांची प्रकृती अधिकच बिघडली. टीव्ही अभिनेत्री टीना घई हिने सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे गुफी पँटलची प्रकृती गंभीर असल्याची पुष्टी दिली होती.

गुफी पेंटलची कारकीर्द

गुफी पेंटलच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे तर त्यांनी 1980 च्या दशकात अनेक चित्रपटांमध्ये काम केले. त्याच वेळी ते टीव्ही मालिकांमध्येही दिसले. बीआर चोप्रा यांच्या महाभारत या मालिकेत शकुनी मामाची भूमिका साकारून त्यांना घरोघरी ओळख मिळाली. आजही हे पात्र लोकांच्या मनात जिवंत आहे. गुफी पेंटल अभिनेता होण्यापूर्वी एक इंजिनियर होते.हेही वाचा

पडद्यावरील आई गेली! मराठी आणि हिंदी सिनेसृष्टी गाजवली

रणदीप हुडाच्या 'स्वतंत्र वीर सावरकर' चित्रपटाच्या टिझरवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पणतू नाराज

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा