Advertisement

बिग बाॅस’च्या घरात ‘फुल्ली-गोळा’ चा डाव


बिग बाॅस’च्या घरात ‘फुल्ली-गोळा’ चा डाव
SHARES

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज सई आणि त्यागराजमध्ये रंगणार कॅप्टन्सीचा टास्क... यात कोण बाजी मारणार? कोण बनणार घराचा नवा कॅप्टन? हे पाहायला मिळेल.


कॅप्टन्सीचे कार्य

सगळ्या समस्यांवर मात करत स्वत:चं वर्चस्व सिद्ध करण्याची सुवर्णसंधी म्हणजे “कॅप्टनसी”. यामुळेच बिग बॉस आज सदस्यांवर सोपवणार “फुल्ली–गोळा” हे कॅप्टन्सीचे कार्य. फुल्ली गोळ्याच्या डावामध्ये होणार शब्दांचे घाव. या कार्याअंतर्गत टीम सई आणि टीम त्यागराज असे दोन गट असणार आहेत. खेळातील तिढा सोडवत एका उमेदवाराला जिंकणं हे कॅप्टन्सीचं खरं कार्य आहे.


वाद-विवाद रंगणार

या टास्कमध्ये बरेच मतभेद, भांडण, तसंच एकमेकांना सल्ले दिले जाणार आहेत. सई आणि स्मितामध्ये वाद रंगणार आहे. तर आस्तादला सईच्या बोलण्याची पद्धत पटत नाही असं तो तिला बजावून सांगणार आहे. तसेच कार्यामध्ये सई हे कबूल करणार आहे कि, या घरामध्ये आल्यावर तिला हे कळून चुकले आहे कि प्रत्येक ठिकाणी सांभाळून घेण्यासाठी आई – वडील नसतात. त्यावर रेशमचं असे म्हणणं असणार आहे कि, “तुला हे कळायला दीड महिना लागला? आणि यावरूनच रेशमनं मेघाला सल्ला देखील दिला की सई हुशार आहे. तिला तिचं डोकं आहे. तिच्या पायावर तिला उभं राहू दे, तिला उत्तर देऊ दे.” रेशमचं असं बोलणं मेघाला अजिबात पटणार नाही आणि ती शर्मिष्ठा आणि आऊला हे बोलून देखील दाखवणार आहे कि, पहिल्यापासूनच यांना माझ्या आणि सईच्या मैत्रीमध्ये फुट पाडायची आहे.हेही वाचा -

‘कान’नंतर ‘सिडनी’मध्ये ‘मंटो’ची वर्णी

कोण बनणार ‘भाई’?संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा