Advertisement

INOX ची भन्नाट ऑफर, मोफत तिकिटं मिळवण्यासाठी फक्त एवढंच करा

मल्टिप्लेक्स पुन्हा सुरू करण्यात येत आहेत. याच निमित्त एका मल्टिप्लेक्सनं एक भन्नाट ऑफर दिली आहे.

INOX ची भन्नाट ऑफर, मोफत तिकिटं मिळवण्यासाठी फक्त एवढंच करा
SHARES

२२ ऑक्टोबरपासून मल्टिप्लेक्स (Cinemas Reopening) पुन्हा सुरू होत आहेत. बऱ्याच काळापासून मल्टिप्लेक्स (multiplexes) बंद होते. पण राज्य सरकारनं दिलेल्या गाईडलाईन्सचं पालन करत मल्टिप्लेक्स पुन्हा सुरू करण्यात येत आहेत. याच निमित्त एका मल्टिप्लेक्सनं एक भन्नाट ऑफर दिली आहे.

मल्टीप्लेक्स चेन आयनॉक्स लेझर लिमिटेड ( Inox Leisure Ltd) प्रेक्षकांसाठी एक अद्भुत भेट घेऊन आली आहे. मल्टीप्लेक्स प्रेक्षकांना भेटवस्तू म्हणून मोफत चित्रपट तिकिटे वितरीत करत आहेत.

मल्टिप्लेक्स चेन आयनॉक्स लेझर लिमिटेडनं जाहीर केलं आहे की, ते २२ ऑक्टोबर २०२१ रोजी महाराष्ट्रातील कोणताही चित्रपट पाहण्यासाठी त्यांच्या चित्रपटगृहात येणाऱ्या सर्व पाहुण्यांना बिनशर्त मोफत तिकीट देण्यात येईल.

लोकांना ही ऑफर INOX वेबसाइट आणि अॅपवर मिळेल. इथं तुम्ही सकाळी ९ ते सकाळी १० पर्यंत बुकिंग करून ही मोफत तिकिटे घेऊ शकता. केवळ महाराष्ट्रात राहणाऱ्या लोकांनाच इनॉक्सच्या या ऑफरचा लाभ मिळू शकतो. या उपक्रमाद्वारे, INOX ला फक्त आपल्या पाहुण्यांचे आभार मानायचे आहेत.

आयनॉक्स लेझर लिमिटेडचे प्रादेशिक संचालक (पश्चिम) अतुल भांडारकर म्हणाले की, 'महाराष्ट्रातील चित्रपटगृहे शेवटी पुन्हा सुरू होण्यास तयार आहेत. आम्ही आमच्या पाहुण्यांना त्यांनी दिलेल्या प्रेम आणि विश्वासाबद्दल बिनशर्त धन्यवाद देऊ इच्छितो.

ते पुढे म्हणाले की, आमच्या पाहुण्यांचे स्वागत म्हणून आम्ही त्यांना २२ ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी ९ ते सकाळी १० या दरम्यान महाराष्ट्र राज्यातील सर्व मॉर्निंग शोसाठी मोफत तिकिटे देत आहोत. भारत कोरोना महामारीतून बाहेर पडत असताना, आम्ही राज्यभरातील चित्रपट प्रेमींच्या स्वागतासाठी सज्ज आहोत'.

सिनेमा हॉल आणि थिएटर ५० टक्के क्षमतेसह पुन्हा सुरू होतील. ज्यांनी पूर्णपणे लसीकरण केलं आहे. फक्त त्या लोकांना येण्याची परवानगी असेल. सर्व पाहुण्यांना मास्क घालणं, शारीरिक अंतर राखणे, खोकताना,शिंकताना चेहरा झाकणं आणि हाताची नियमित स्वच्छता यासह कोविड प्रोटोकॉलचे पालन करावं लागेल.हेही वाचा

असं काय झालं की जान्हवीनं बोनी कपूरना सगळ्यांसमोर खडसावलं?

जगभरात धुमाकूळ घालणारा बाहुबली लवकरच मराठीत

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा