Advertisement

जॅकलीन-सलमाननं जिंकली इन्स्टाग्रामवरील रेस


जॅकलीन-सलमाननं जिंकली इन्स्टाग्रामवरील रेस
SHARES

‘रेस 3’ च्या रिलीजनंतर जॅकलीन फर्नांडीसच्या लोकप्रियतेचा ग्राफ काहीसा उंचावला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये सोशल मीडियावर जॅकलीन आपला को-स्टार सलमान खानसह सगळीकडे दिसत आहे. स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या आकडेवारीनुसार ‘रेस ३’ प्रमाणेच इन्स्टाग्रामवरही बाजी मारत ही जोडी नंबर वन वर पोहोचली आहे.


फॉलोअर्सचं लक्ष वेधलं

अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया या मीडिया टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही लिस्ट दिलेली आहे. रेस-3 च्या प्रमोशनमध्ये सगळीकडे दिसलेली जॅकलीन दबंग टूर दरम्यानही इन्स्टा स्टोरीजव्दारे आपल्या फॉलोअर्सचं लक्ष वेधून घेत होती. तर सलमान मागील काही दिवसांमध्ये रेस-3, ईद सेलिब्रेशन, दस का दम आणि दबंग टूरमुळे लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला आहे.


इन्स्टावर नंबर वन जोडी

स्कोर ट्रेंड्सच्या म्हणण्यानुसार, ‘जॅकलीन अभिनयाप्रमाणेच आपल्या इन्स्टा-पोस्ट आणि इन्स्टा स्टोरीजसाठीही ओळखली जाते. रेस-3 च्या प्रमोशनच्यावेळी आणि दबंग टूरच्या दरम्यान जॅकलीनने शेअर केलेल्या इन्स्टा स्टोरीजच्यामूळे इन्स्टाग्रामवर तिची लोकप्रियता वाढली. सलमानच्या प्रत्येक इन्स्टा फिडला मिळालेल्या लाखो लाइक्स आणि प्रत्येक पोस्टवर येणाऱ्या हजारों कमेंट्सवरून सलमानची लोकप्रियता दिसून येते. याच कारणांमुळे ही जोडी इन्स्टाग्रामवर नंबर वन बनली आहे.



हेही वाचा -

लाडावलेल्या, भरकटलेल्या संजूबाबाची खरीखुरी कहाणी!

संदीपचा नवा अवतार

 



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा