'मल्हार' फेम देवदत्त नागेचा नवा चित्रपट!


SHARE

सिनेसृष्टीत अभिनेते गायक झाल्याचं आपण पाहिलं आहे. तसंच, काही गायक अभिनय ही करतात. त्यात आता अभिनय करता करता निर्माता म्हणून ही काही कलाकारांची नावं घेतली जात आहेत. त्यात श्रेयस तळपदे, स्वप्नील जोशी यांची नावं तर आहेतच, पण आता या यादीत एक नवीन नाव सामील होतंय. ते म्हणजे मल्हार फेम 'देवदत्त नागे' याचं!जवळजवळ ३ वर्ष चाललेल्या 'जय मल्हार' या मालिकेतून देवदत्त घराघरात पोहोचला आणि प्रेक्षकांची वाहवा आणि प्रेम ही मिळवलं. ही मालिका संपल्यानंतर आता देवदत्त कशात दिसणार? याची उत्सुकता असतानाच त्याच्या 'वेलकम टू पटाया' या सिनेमाबद्दल चर्चा सुरु झाली.आता हाच देवदत्त नागे अजून एका सिनेमात पाहायला मिळणार आहे. 'चेंबूर नाका' असं त्या सिनेमाचं नाव असून तो स्वतः या सिनेमाचा निर्माताही आहे. अॅक्शन आणि इमोशन अशा दोन्ही गोष्टी या सिनेमात पाहायला मिळणार आहे.हेही वाचा

'जय मल्हार' पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला!


संबंधित विषय