Advertisement

करण जोहरच्या 'सैराट'च्या रिमेकमध्ये 'हे' कलाकार साकारणार आर्ची आणि परशा!


करण जोहरच्या 'सैराट'च्या रिमेकमध्ये 'हे' कलाकार साकारणार आर्ची आणि परशा!
SHARES

मराठी सिनेसृष्टीत 'सैराट' सिनेमाने इतिहास रचला असं म्हणायला हरकत नाही. शंभर कोटींची कमाई करणाऱ्या सैराटने मराठीच नाही, तर अगदी अमराठी प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं. मराठीनंतर हा सिनेमा कन्नडमध्येही प्रदर्शित झाला आणि त्याही सिनेमात मराठमोळ्या आर्चीने म्हणजेच रिंकू राजगुरूने काम केलं. या सिनेमाचा रिमेक हिंदीतही येणार असल्याची चर्चा खूप आधीपासून होत असताना आता फायनली सैराट हिंदीचं शूटिंग लवकरच सुरु होणार आहे असं समजतंय.



हिंदी 'सैराट' सिनेमात आर्ची आणि परशा यांच्या भूमिका कोण साकारणार? यावर आत्तापर्यंत गुप्तता पाळण्यात आली होती. पण आता आर्ची आणि परशाच्या भूमिकेमध्ये कोण दिसणार? त्यांची नावं समोर आली आहेत. या चित्रपटातून अभिनेत्री श्रीदेवीची लेक जान्हवी कपूर बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असून परशाच्या भूमिकेत शाहिद कपूरचा भाऊ ईशांत खट्टर प्रमुख भूमिकांमध्ये दिसणार आहेत. चित्रपटाची शूटिंग राजस्थानमधील उदयपूर येथे केली जाणार आहे. 

शूटिंगचं लोकेशन बघण्यासाठी काही दिवसांपूर्वीच जान्हवी उदयपूरला पोहोचली होती. करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन बॅनरअंतर्गत निर्मित या चित्रपटाच्या शूटिंगचा मुहूर्तही निश्चित करण्यात आला आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन शशांक खेतान करणार आहे. चित्रपटाच्या शूटिंगला १८ नोव्हेंबरपासून उदयपूर येथे सुरुवात केली जाणार आहे.



हेही वाचा

आर्चीचा दुसरा मराठी चित्रपट!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा