'जग्गा जासूस'च्या प्रदर्शनाचा मुहूर्त पुन्हा टळला


  • 'जग्गा जासूस'च्या प्रदर्शनाचा मुहूर्त पुन्हा टळला
  • 'जग्गा जासूस'च्या प्रदर्शनाचा मुहूर्त पुन्हा टळला
SHARE

मुंबई - रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांची महत्त्वाची भूमिका असलेला चित्रपट जग्गा जासूसच्या प्रदर्शनाबाबत सस्पेंस अजूनही कायम आहे. हा चित्रपट 7 एप्रिलला प्रदर्शित होणार होता. पण पुन्हा या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मुहूर्त टळला आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा चित्रपट 2017 च्या जुलै महिन्यातील पहिल्या आठवड्यात प्रदर्शित होणार आहे. कारण या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी निर्मात्यांनी वेळ मागितला आहे. तर सध्या दिग्दर्शक अनुराग बासू आणि त्यांच्या टीममध्ये या चित्रपट प्रदर्शनाच्या मुहूर्ताबाबत जोरदार चर्चा सुरू असल्याचं बोललं जात आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या