Advertisement

महाराष्ट्राच्या लावणीची हाॅलिवुडपटात ठसकेबाज एंट्री


महाराष्ट्राच्या लावणीची हाॅलिवुडपटात ठसकेबाज एंट्री
SHARES

महाराष्ट्राची शान म्हणजेच मराठमोळी लावणी. महाराष्ट्राची लोककला किंवा लोकनृत्य म्हटल्यावर प्रत्येकाच्या मुखात एकच नाव असतं ते म्हणजे लावणी. महाराष्ट्राच्या या ठसकेबाज लावणीनं अाता सातासमुद्रापार झेप घेतली अाहे. एका हाॅलीवूड चित्रपटात लावणीची ठसकेबाज एंट्री होणार अाहे. राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावर हाॅलीवूड सिनेमा साकारला जाणार असून त्यात लावणीही सादर केली जाणार अाहे.


राणी लक्ष्मीबाईंच्या जीवनावर बनणार हाॅलीवूड सिनेमा

राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावर आधारित या सिनेमाचं नाव अाहे 'स्वाॅर्डस् अँड स्केप्टर्स'. विख्यात कोरियोग्राफर स्वाती भिसे या सिनेमाचं दिग्दर्शन करणार असून त्यांची मुलगी देविका या सिनेमात लक्ष्मीबाईंची भूमिका साकारणार आहे.


हाॅलीवूडसह मराठी कलाकारही दिसणार

या चित्रपटात हॉलिवूडच्या कलाकारांसह अनेक मराठी कलाकारही दिसतील. डेरेक जेकोबी, नॅथनियल पार्कर, रुपर्ट इव्हरेट हे हाॅलीवूडचे कलाकार या चित्रपटात दिसतील तर नागेश भोसले, यतिन कार्येकर, मिलिंद गुणाजी, अारिफ झकारिया अाणि अजिंक्य देव मराठी कलाकारही या चित्रपटात भूमिका साकारणार अाहेत. हाॅलीवूडची अभिनेत्री जोधी ही राणी व्हिक्टोरियाच्या भूमिकेत दिसणार असून अजिंक्य देव हा तात्या टोपेंची भूमिका साकारणार अाहे. पुढच्या वर्षी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.हेही वाचा - 

'दशक्रिया'च्या गल्ल्यावर ज्युली २ चा डल्ला?

शुटिंगच्या पहिल्या दिवशीच जान्हवीवर संतापले 'धडक'चे दिग्दर्शक


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा