Advertisement

'दशक्रिया'च्या गल्ल्यावर ज्युली २ चा डल्ला?

नेरूळमधील 'मॅक्स मुव्हीज' मल्टिप्लेक्समध्ये एका प्रेक्षकाने 'दशक्रिया' या बहुचर्चित मराठी सिनेमाचं तिकीट मागितल्यावर त्यांना चक्क ज्युली २ या सिनेमाचं तिकीट देण्यात आलं. आश्चर्याची बाब म्हणजे आत गेल्यावर सिनेमागृहात 'दशक्रिया' सिनेमाच दाखवण्यात येत होता. यामुळे 'दशक्रिया'च्या गल्ल्यावर हिंदी सिनेमा डल्ला मारतोय की काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

'दशक्रिया'च्या गल्ल्यावर ज्युली २ चा डल्ला?
SHARES

मराठी सिनेमा कितीही दर्जेदार असला, तरी तो हिंदी सिनेमापुढे बाॅक्स आॅफिसवर तग धरत नाही, ही कल्पना मागच्या काही वर्षांमध्ये मोडीत निघाली आहे. बजेट छोटं असलं तरी कमाईच्या बाबतीत दसपट गल्ला जमवणाऱ्या मराठी सिनेमाचा धसका आता बाॅलिवूडनंही घेतल्याचं एका ताज्या उदाहरणाहून स्पष्ट झालं आहे. नेरूळमधील 'मॅक्स मुव्हीज' मल्टिप्लेक्समध्ये एका प्रेक्षकाने 'दशक्रिया' या बहुचर्चित मराठी सिनेमाचं तिकीट मागितल्यावर त्यांना चक्क ज्युली २ या सिनेमाचं तिकीट देण्यात आलं. आश्चर्याची बाब म्हणजे आत गेल्यावर सिनेमागृहात 'दशक्रिया' सिनेमाच दाखवण्यात येत होता. यामुळे 'दशक्रिया'च्या गल्ल्यावर हिंदी सिनेमा डल्ला मारतोय की काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.


काय आहे प्रकरण?

सेल्स टॅक्सचे आयुक्त दिलीप देशमुख गुरूवारी रात्री ९ वाजता नेरूळमधील मॅक्स मल्टिप्लेक्समध्ये 'दशक्रिया' चित्रपट बघायला गेले. मल्टिप्लेक्समध्ये पोहोचायला उशीर झाल्यामुळे त्यांनी घाईतच सिनेमाची २ तिकीटं काढली. त्यांना स्क्रीन २ चे D7 आणि D 8 असे आसनक्रमांक असलेली तिकीटं देण्यात आली. मध्यंतरात त्यांनी सहज तिकीट बघतलं असता आपल्याला 'दशक्रिया' ऐवजी ज्युली २ चं तिकीट दिल्याचं त्यांच्या लक्षात आलं. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. मध्यंतरापर्यंत तिकीट काऊंटरही बंद झालं होतं.



याआधीही असे प्रकार?

खरंतर देशमुख यांनी 'दशक्रिया' सिनेमासाठी पैसे मोजले होते. परंतु त्यांना ज्युली २ सिनेमाचं तिकीट देण्यात आल्याने ते पैसे ज्युली २ सिनेमाच्या खात्यात जमा झाले. हा प्रकार देशमुख यांच्यामुळे उघडकीस आला असला, तरी या आधीही असे अनेक प्रकार घडल्याची शक्यता नाकारता येत नाही.


आम्हाला चित्रपटगृहात पोहोचायला उशीर झाला. त्यामुळे आम्ही घाईतच 'दशक्रिया' सिनेमाची २ तिकीटं घेतली. आम्ही आत पोहोचेपर्यंत चित्रपट सुरू झाला होता. त्यामुळे नेमकी कोणती तिकीटं आम्हाला मिळाली हे बघता आलं नाही. मध्यंतरादरम्यान सहज तिकीटं बघितली असता 'दशक्रिया' एेवजी ज्युली-२ चं तिकीट दिल्याचं कळलं. मी ताबडतोब तिकीट काऊंटरवर गेलो, मात्र तोपर्यंत काऊंटर बंद झालं होतं.

- दिलीप देशमुख, प्रेक्षक


कलेक्शन वाढवण्यासाठी?

बाॅक्स आॅफिस कलेक्शनचा आकडा वाढवण्यासाठी, १०० ते २०० कोटी रुपयांचा क्लब गाठण्यासाठी बाॅलिवूडमध्ये असे प्रकार नेहमीच चालतात काय? आणि त्यासाठी मराठी चित्रपटांच्या गल्ल्यावरच डल्ला मारला जातोय काय? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.


घडलेला प्रकार अतिशय चुकीचा आहे. असा प्रकार घडत असेल, तर त्यावर कारवाई करायला हवी. मल्टिप्लेक्सविरोधात तक्रार करायची की नाही याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही. पण लवकरात लवकर 'दशक्रिया'ची संपूर्ण टीम मिळून याबबात निर्णय घेईल.

- नील कोठारी, निर्माता, 'दशक्रिया' सिनेमा



हेही वाचा-

बॉक्स ऑफिसवर ‘दशक्रिया’ सुपरहिट, लवकरच जगभरात होणार प्रदर्शित!

'दशक्रिया'च्या प्रदर्शनाविरोधातील याचिका फेटाळली


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा