Advertisement

पुलवामा शहिदांवर अमित्रियानची 'रेड इंक'

पुलवामामध्ये एसआरपीएफच्या जवानांवर अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यानं संपूर्ण देश हादरवून टाकला आहे. सामान्यांपासून असामान्यांपर्यंत सर्वच जण या घटनेचा निषेध करत आपलं मत व्यक्त करत आहेत. अभिनेता अमित्रियान पाटीलनं पुलवामा हल्ल्यात शहिद झालेल्या जवानांबाबतच्या भावना एका कवितेद्वारे व्यक्त केल्या आहेत.

पुलवामा शहिदांवर अमित्रियानची 'रेड इंक'
SHARES

पुलवामामध्ये एसआरपीएफच्या जवानांवर अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यानं संपूर्ण देश हादरवून टाकला आहे. सामान्यांपासून असामान्यांपर्यंत सर्वच जण या घटनेचा निषेध करत आपलं मत व्यक्त करत आहेत. अभिनेता अमित्रियान पाटीलनं पुलवामा हल्ल्यात शहिद झालेल्या जवानांबाबतच्या भावना एका कवितेद्वारे व्यक्त केल्या आहेत.


वेगळ्या अंदाजात आदरांजली

जगात गुलाबी दिवस म्हणजेच व्हॅलेंटाईन डे साजरा होत असताना, जम्मू-काश्मीर येथील पुलवामामध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात भारताच्या ४० जवानांना आपला प्राण गमवावा लागला. या हल्ल्याचा सर्वत्र निषेध होत असून, याची दाखल जागतिक पातळीवर घेतली जात आहे. एक भारतीय म्हणून देशातील प्रत्येक नागरिकांचं रक्त पुन्हा एकदा सळसळू लागलं आहे. देशभक्तीपर आणि शाहिद जवानांप्रती जयघोष व श्रद्धांजली व्यक्त केली जात आहे. मराठी अभिनेता अमित्रियान पाटीलने मात्र पुलवामा येथे शाहिद झालेल्या जवानांना एका वेगळ्या अंदाजात आदरांजली वाहिली आहे.



'रेड इंक'

अमित्रियाननं कवीमनाला आधार घेत, 'रेड इंक' नावाची एक भावूक कविता शहिदांना समर्पित केली आहे. ही कविता इंग्रजीमध्ये असून, या कवितेत त्याने शाहिद जवानांचा उल्लेख माझी भावंडं असा केला आहे, जे मनाला स्पर्शून जातं. सोशल नेटवर्कींग साईटवर पोस्ट केलेली हि कविता नेटकऱ्यांच्या मनाचा वेध घेत आहे. एक अभिनेता म्हणून नव्हे तर, अमित्रियानच्या अंतर्मनात दडलेल्या एका संवेदनशील कवीचा देखील परिचय या निमित्ताने होतो.


आसूड सिनेमात नायक

अमित्रियानची मुख्य भूमिका असलेला ‘आसूड’ हा सिनेमा काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला आहे. त्यात त्याने शेतकऱ्यांचा कैवारी असलेल्या नायकाची भूमिका साकारली आहे. वास्तवात गावाकडून शहरात येत आपलं करिअर घडवणाऱ्या अमित्रियानला शेतकऱ्यांच्या कथा आणि व्यथा चांगल्याच ठाऊक आहेत. पुलवामा हल्ल्याच्या निमित्ताने शहिदांच्या बाबतीतील त्याच्या भावनाही सर्वांना समजल्या आहेत.



हेही वाचा -

बारावीची परीक्षा गुरूवारपासून

आर्चीला ‘ऑल दी बेस्ट’ केलं का?



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा