Advertisement

स्वप्नील जोशीच्या मुलाचं बारसं, काय ठेवलं नाव?


स्वप्नील जोशीच्या मुलाचं बारसं, काय ठेवलं नाव?
SHARES

गेल्या महिन्यात मराठी अभिनेता स्वप्नील जोशी याच्या घरात एका चिमुकल्याचं आगमन झालं. स्वप्नीलची पत्नी लिनाने ७ डिसेंबरला एका गोंडस बाळाला जन्म दिला. आता या बाळाचं बारसंही करण्यात आलं आहे!स्वप्नीलने आपल्या गोंडस मुलाचं नावं राघव असं ठेवलंय. राघवच्या येण्याने जोशी मंडळी सध्या भलतीच खूश आहेत! स्वप्नील आणि लीना दोघेही १६ डिसेंबर २०११ ला लग्नबंधनात अडकले. लिना ही व्यवसायाने डेंटिस्ट आहे. लिना मूळची औरंगाबादची आहे.या दाम्पत्याला मायरा ही पहिली मुलगी आहे. मायरा आता दीड वर्षांची आहे. सध्या स्वप्नीलचं शेड्युल बिझी आहे. तो जास्तीत जास्त वेळ मायरा आणि राघवला देण्याच्या प्रयत्नात असतो.स्वप्नीलने उत्तर रामायण या मालिकेतून वयाच्या नवव्या वर्षी अभिनय कारकिर्दीला सुरूवात केली. त्यानंतर त्याने कृष्णा या मालिकेत श्रीकृष्णाची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं.संबंधित विषय
Advertisement