Advertisement

अमृता खानविलकरचं आगळं-वेगळं बर्थडे सेलिब्रेशन!


अमृता खानविलकरचं आगळं-वेगळं बर्थडे सेलिब्रेशन!
SHARES

आपला वाढदिवस खास व्हायला हवा, असं सगळ्यांनाच वाटतं. पण त्यातले किती जण खरंच स्वतःचा वाढदिवस वेगळ्या प्रकारे साजरा करतात? मृता खानविलकरने मात्र हे केलंय. खरंतर अमृताचा वाढदिवस असतो २३ नोव्हेंबरला. पण या तारखेआधीच तिने तिच्या वेगळ्या बर्थडे सेलिब्रेशनची सुरुवात केली आहे. दरवर्षी अमृता आपला वाढदिवस तारखेआधीच साजरा करते. किंबहुना तिचे फॅन्सच तिचा बर्थडे वीक सेलिब्रेट करतात. यावेळीही तिने तेच केलंय. नुकताच तिने दादर मध्ये असलेल्या प्रगती विद्यालय या कर्णबधिर मुलांच्या शाळेला भेट देऊन तिचा वाढदिवस खास पद्धतीने साजरा केला.



या मुलांसोबत अमृताने तिच्या वाढदिवसाचा आनंद द्विगुणित केला. बर्थडे सेलिब्रेशनच्या निमित्ताने या शाळेतील मुलांची भेट घेतली. तिथल्या शिक्षकांनी तिचे विशेष स्वागत केले. लहान मुलांनी तिच्यासाठी हॅपी बर्थडेची जिंगल गायली. स्वतः बनवलेली कागदी फुले तिला भेट म्हणून दिली. हे सर्व पाहून नक्कीच अमृताचा उत्साह द्विगुणित झाला.

 


तिने या मुलांसोबत डान्स देखील केला. अमृता सांगते, "शाळेत असताना मी वाढदिवस शाळेतील मित्र मैत्रिणींसोबत खाऊ वाटून साजरा करायचे. पण आता इथे येऊन या मुलांना खाऊ देऊन त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मी समाधानी झाले आहे. इथे येऊन मी बरंच काही शिकले.



या मुलांच्या दुनियेत धन्यवाद, स्वागत करणे हे सर्व ते हावभावाने करतात. त्यांची टाळ्या वाजवण्याची पद्धत तर फारच सुंदर आहे. मी आता अशाच प्रकारे टाळ्या वाजवणार! इतकं सगळं नवीन शिकायला मिळणं हा एक प्रकारचा स्वार्थच आहे, नाही का? सध्या अमृता डान्स इंडिया डान्स या हिंदी कार्यक्रमामध्ये होस्ट म्हणून दिसत आहे. आणि लवकरच ती मेघना गुलझार दिग्दर्शित ‘राझी’ या चित्रपटामध्ये आलिया भट सोबत दिसणार आहे.



हेही वाचा

आलिया जेव्हा अमृताला भेटवस्तू पाठवते...!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा