Advertisement

का चुकला हेमांगीचा १६चा पाढा? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य इथे वाचा!

१६ एके १६, १६ दुणे ३६, १६ त्रिक ९३ असा हा अनोखा पाढा ऐकल्यावर अनेकांच्या भुवया वर गेल्या. आणि त्यावर उलटसुलट प्रतिक्रिया द्यायला सुरूवात झाली. हा पाढा म्हणणारी व्यक्ती आहे अभिनेत्री हेमांगी कवी. हेमांगीने हा १६ च्या पाढ्याचा व्हिडिओ फेसबुकवर टाकताच तिच्यावर नेटकऱ्यांनी टीका करायला सुरूवात केली.

का चुकला हेमांगीचा १६चा पाढा? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य इथे वाचा!
SHARES

सध्या सोशल मिडीयावर सोळाच्या पाढयाची चांगलीच चर्चा रंगतेय. हा अनोखा सोळाचा पाढा ऐकून अनेकांना धक्का बसला आहे! १६ एके १६, १६ दुणे ३६, १६ त्रिक ९३ असा हा अनोखा पाढा ऐकल्यावर अनेकांच्या भुवया वर गेल्या. आणि त्यावर उलटसुलट प्रतिक्रिया द्यायला सुरूवात झाली.   हा पाढा म्हणणारी व्यक्ती आहे अभिनेत्री हेमांगी कवी. हेमांगीने हा १६ च्या पाढ्याचा व्हिडिओ फेसबुकवर टाकताच तिच्यावर नेटकऱ्यांनी टीका करायला सुरूवात केली.


 

या व्हिडिओनंतर हेमांगीला मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले आहे. 'या मराठी अभिनेत्रींना धड पाढा म्हणता येत नाही, ही बाई कोणत्या शाळेत शिकली', अशा एक ना अनेक टीका हेमांगीला सहन कराव्या लागल्या.

मात्र हा व्हिडिओ केवळ एक गंमत म्हणून केला गेला आहे. अभिनेत्री शर्वणी पिल्लई हिचं एक नवीन नाटक रंगभूमीवर येत आहे. '१६ एके १६'. या नाटकाच्या प्रमोशनसाठी हेमांगी कवीने १६ चा पाढा म्हणून दाखवण्याचं चॅलेंज स्विकारलं होतं. मात्र नेहमीसारखा पाढा न म्हणता थोडा विनोदी अंगाने हा पाढा हेमांगीने सादर केला आणि इथेच गणित चुकलं. मात्र हा विनोद लक्षात न आलेल्या नेटकऱ्यांनी हेमांगीला चांगलचं धारेवर धरलं. यानंतर हेमांगीने नेमका हा प्रकार काय आहे, याबबात एक व्हिडिओ आपल्या चाहत्यांसाठी तयार केला आहे.

मला सगळ्यांना एवढंच सांगायचं आहे, की आपण अर्धवट बघून, वाचून रिअॅक्ट होतो. ते बंद करायला हवं. सोशल मीडियाचा चांगला वापर करायला हवा. मी चांगल्या हेतूनं हे केलं. कारण नाटकाला याचा फायदा व्हावा. आजकाल प्रमोशनसाठी अनेक फंडे वापरले जातात. लोकांच्या प्रतिक्रिया  वाचून मला त्यांच्या मानसिकतेवर खूप हसू येतंय.

हेमांगी कवी, अभिनेत्री



हेही वाचा

राम कपूरच्या मुलाला मिळाला 'ऑस्कर'!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा