Advertisement

८ सप्टेंबरला 'बॉईज' येणार!


SHARES

किशोरवयीन मुलांचे भावविश्व मांडणारा 'बॉईज' हा मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांसमोर दाखल होणार आहे. नुकताच या सिनेमाचे म्युझिक आणि ट्रेलर लॉन्च सचिन पिळगावकर आणि सुरेश वाडकर यांच्या हस्ते पार पडले. 'बॉईज' सिनेमात चक्क सनी लिओनी थिरकताना दिसणार आहे. त्यामुळे या सोहळयाला तिने विशेष उपस्थिती लावली होती.  

मित्रांची दुनिया या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ज्यात सुमंत शिंदे, पार्थ भालेराव आणि प्रतिक लाड हे कलाकार दिसून येत असून, पार्थ आणि प्रतिकच्या खोड्या आणि सुमंतचा शांत, सुशील स्वभाव आपल्याला पाहायला मिळतो.

अभिनेता संतोष जुवेकर एका शिक्षकाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर 'बॉईज' या नावाला साजेसा असून, किशोरवयीन मुलांची दुनिया यात मांडण्यात आली आहे. मैत्री, प्रेम, शाळा आणि अभ्यास या चार भिंतीतील त्यांची रंगीत दुनिया 'बॉईज'च्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे.

अवधूत गुप्ते लिखित 'लग्नाळू' आणि 'यारीया' या गाण्याचे देखील सादरीकरण यावेळी करण्यात आले. स्वप्नील बंदोडकरच्या आवाजातील 'जीवना' आणि 'लग्नाळू' या गाण्याला देखील प्रेक्षकांचे अमाप प्रेम मिळत आहे. कौस्तुभ गायकवाड आणि जनार्दन खंडाळकर या जोडीने हे गाणे गायले आहे.  येत्या ८ सप्टेंबरला हा सिनेमा प्रदर्शित होईल.डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा