Advertisement

अनिकेतच्या उपस्थितीत 'क्षितिजा परी...' लाँच

प्रेमाला वय नसतं किंवा कसलंही बंधन नसतं. प्रेम या भावनेची व्याख्याच निराळी असते, त्यासाठी प्रेमातच पडावं लागतं. याच अल्लड प्रेमाची नवी व्याख्या मांडणारं झी म्युझिक प्रस्तुती असलेला 'क्षितिजा परी...' हा व्हिडीओ रसिक दरबारी सादर करण्यात आलं आहे.

अनिकेतच्या उपस्थितीत 'क्षितिजा परी...' लाँच
SHARES

पूर्वीच्या काळी रसिकांचं मनोरंजन करणारे गाण्यांचे अल्बम प्रकाशित व्हायचे. पण आताचा जमाना वेगळा आहे. आजचा जमाना सिंगलचा आहे. सध्या एखादं गाणं व्हिडीओच्या सहाय्याने प्रदर्शित करून रसिकांना दृकश्राव्य स्वरूपात प्रदर्शित करण्याचा ट्रेंड प्रचलित आहे. त्यानुसार गाणी सिंगलच्या रूपात रसिकांच्या मनाचा ठाव घेत आहेत. असंच एक 'क्षितिजा परी...' हे गीत नुकतंच अभिनेता अनिकेत विश्वासरावच्या उपस्थितीत प्रदर्शित करण्यात आलं आहे.


अल्लड प्रेमाची नवी व्याख्या 

प्रेमाला वय नसतं किंवा कसलंही बंधन नसतं. प्रेम या भावनेची व्याख्याच निराळी असते, त्यासाठी प्रेमातच पडावं लागतं. याच अल्लड प्रेमाची नवी व्याख्या मांडणारं झी म्युझिक प्रस्तुती असलेला 'क्षितिजा परी...' हा व्हिडीओ रसिक दरबारी सादर करण्यात आलं आहे. या छोटेखानी सोहळ्याला अनिकेत विश्वासराव प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित होता. एम. सुधाकर फिल्म्स निर्मित हा म्युझिक व्हिडिओ दुर्गेश पाटील या गायकाच्या आवाजात स्वरबद्ध करण्यात आला असून, त्याच्यावरच तो चित्रित करण्यात आला आहे. महेश मटकर यांच्या संगीताने नटलेल्या या व्हिडिओचे कॅमेरामन सोनी सिंग आहेत. 


मराठीतील अरिजीत सिंग

'क्षितिजा परी...' हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनिकेत म्हणाला की, दुर्गेशचा आवाज हा मराठीसाठी दुर्मिळ आहे. दुर्गेश पाटीलच्या रूपाने मराठी सिनेमाला अरिजीत सिंग मिळाला आहे. कोणतीही गोष्ट खऱ्या आणि निर्मळ प्रेम भावनेतून केली, तर सर्वांनाच भावते. असंच काहीसं 'क्षितिजा परी...' या गाण्याबद्दल वाटतं. या संपूर्ण टीमचा उत्साह खरोखर कौतुकास्पद आहे. सुंदर लोकेशन्स आणि गाण्यातील शब्दांची गुंफण खरोखर पुन्हा एकदा प्रेमात पाडते यात शंकाच नाही.


सहज गाणं लिहिलं

या व्हिडीओमध्ये दुर्गेशने अभिनयही केला असून, त्याच्या जोडीला पूजा ठाकूर आहे. जळगावसारख्या ठिकाणाहून आलेला हा दुर्गेश जितका साधा तितकाच आपल्या कामाशी प्रामाणिक आहे. त्याने या प्रेम गीताला पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबत दुर्गेश म्हणाला की, मी सहज हे गाणं लिहिलं, पण ज्यांना ज्यांना ऐकवलं त्यांना खूप आवडलं म्हणून याचा व्हिडिओ करण्याचं ठरवलं. मला अभिनयाची आवड असल्याने मीच यात काम करायला तयार झालो. यानंतर अभिनयाकडेही जास्त लक्ष देणार असल्याचंही दुर्गेश म्हणाला. 


 कुलू-मनालीला चित्रीकरण

'क्षितिजा परी...' हे गीत कुलू-मनाली या निसर्गरम्य ठिकाणी चित्रित करण्यात आलं आहे. हे गाणं रोमँटिक असल्याने १८ ते ३० वयोगटातील प्रेक्षकांना जास्त भावेल, असा विश्वास दिग्दर्शक एम. सुधाकर यांनी व्यक्त केला आहे. एम. सुधाकर यांचा हा पहिलाच मराठी म्युझिक व्हिडिओ असला तरी त्यांनी यापूर्वी दक्षिणेत तमन्ना भाटिया, बॉलीवुडमध्ये वरूण धवन, संजय दत्त या बड्या कलाकारांना कोरिओग्राफ केलं आहे.हेही वाचा - 

दुर्दैवी, अफवा खरी ठरली! ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांचं कॅनडात निधन

Video- कादर खान यांचे ७ जबरदस्त डायलाॅग, जे आजही आहेत लक्षात

Video- कादर खान यांची गोविंदासोबतची डबल धमाल

संबंधित विषय
Advertisement