Advertisement

लतादीदींवरील मीनाताई मंगेशकर लिखित ‘मोठी तिची सावली’ लवकरच

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची जीवन कथा सांगणारं मीना मंगेशकर-खडीकर लिखित व प्रकाशक आप्पा परचुरे यांच्या परचुरे प्रकाशन मंदिरातर्फे प्रकाशित 'मोठी तिची सावली' हे पुस्तक लवकरच रसिकांच्या भेटीस येणार आहे.

लतादीदींवरील मीनाताई मंगेशकर लिखित ‘मोठी तिची सावली’ लवकरच
SHARES

गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या ९० व्या वर्षातील पदार्पणानिमित्त त्यांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकणाऱ्या ‘मोठी तिची सावली’ या पुस्तकाची घोषणा करण्यात आली आहे. हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर-खडीकर, प्रकाशक आप्पा परचुरे, अविनाश प्रभावळकर यांच्या उपस्थितीत प्रभुकुंज येथे ‘हृदयेश आर्टस्’ च्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत या पुस्तकाची अधिकृत घोषणा करण्यात आली.


मनोरंजक घटनांचा समावेश

आपल्या सुमधूर आवाजाने कोट्यवधी लोकांच्या मनांना मोहिनी घालणाऱ्या आणि प्रत्येक भारतियाचा अभिमान असणाऱ्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची जीवन कथा सांगणारं मीना मंगेशकर-खडीकर लिखित व प्रकाशक आप्पा परचुरे यांच्या परचुरे प्रकाशन मंदिरातर्फे प्रकाशित 'मोठी तिची सावली' हे पुस्तक लवकरच रसिकांच्या भेटीस येणार आहे. सर्वांच्या लाडक्या लतादीदींच्या आयुष्यातील अनेक मनोरंजक घटनांचा समावेश या पुस्तकात असणार आहे.


२८ सप्टेंबरला प्रकाशन 

‘मोठी तिची सावली’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा २८ सप्टेंबर रोजी लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्राताई महाजन यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतीक आणि शैक्षणिक मंत्री विनोद तावडे या सोहळ्याचे मुख्य अतिथी असतील. सोहळ्याचं अध्यक्षस्थान शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे भूषविणार आहेत. पं. शंकर अभ्यंकर या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते असून, आप्पा परचुरे आणि प्रवीण जोशी यांच्यासमवेत अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याचं ‘हृदयेश आर्ट्स’च्या वतीने सांगण्यात आलं आहे.



हेही वाचा -

‘अराररारा...’ प्रविण तरडेने केला ‘खतरनाक’ डान्स

इन्स्टावर श्रद्धा बनली लोकप्रिय ‘स्त्री’!



 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा