Advertisement

अभिनंदन, इन्स्पेक्टर विजय! मुंबई पोलिसांकडून ‘बिग बीं’ना शुभेच्छा!

मुंबई पोलिसांनी देखील हटके पद्धतीने अमिताभ यांना ट्विटर हँडलच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. केंद्रीय माहिती-प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंगळवारी अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाल्याची घोषणा केली होती.

अभिनंदन, इन्स्पेक्टर विजय! मुंबई पोलिसांकडून ‘बिग बीं’ना शुभेच्छा!
SHARES

बाॅलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना नुकताच प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराची घोषणा होताच केवळ बाॅलिवूडच नव्हे, तर देशभरातील विविध कलाक्षेत्रातून अमिताभ यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. त्याचप्रमाणे मुंबई पोलिसांनी देखील हटके पद्धतीने अमिताभ यांना ट्विटर हँडलच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत.  

केंद्रीय माहिती-प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंगळवारी अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाल्याची घोषणा केली होती.

मुंबई पोलीस ट्विटर हँडलच्या माध्यमातून नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर व्यक्त होत असते. त्यानुसार अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल मुंबई पोलिसांनी आपल्या वेगळ्या शैलीत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. मुंबई पोलिसांनी आपल्या ट्विटर हँडलवर अमिताभ बच्चन यांच्या 'जंजीर' या सुपरहिट सिनेमातील एक फोटो शेअर केला आहे. 

 

या सिनेमात अमिताभ बच्चन यांनी इन्स्पेक्टर विजय ही पोलिस अधिकाऱ्याची व्यक्तीरेखा साकारली होती. या फोटोखाली 'दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी तुमची निवड झाल्याबद्दल अभिनंदन... इन्स्पेक्टर विजय...अमिताभ बच्चन...अनेक पिढ्यांसाठी सदाबहार...स्फूर्तीदायी...आणि प्रेरणदायी व्यक्तीमत्व ठरल्याबद्दल सलाम' असं म्हणत मुंबई पोलिसांनी बिग बींना शुभेच्छा दिल्या आहेत.हेही वाचा-

अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

अमिताभ यांनी 'यासाठी' मानलं चाहत्यांचं आभारसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा