Advertisement

राजकारण्यांच्या उपस्थितीत ‘पाटील’ चित्रपटाचं संगीत प्रकाशन

समाजातील दाहक वास्तवावर प्रकाशझोत टाकणाऱ्या चित्रपटांना प्रेक्षकांनी नेहमीच चांगला प्रतिसाद दिला आहे. अशाच एका जिद्दी युवकाच्या संघर्षाचा वेध घेणाऱ्या ‘पाटील’ या मराठी चित्रपटाचा म्युझिक लॉन्च सोहळा नुकताच महाराष्ट्राचे महसूल, मदत-पुनर्वसन आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला.

राजकारण्यांच्या उपस्थितीत ‘पाटील’ चित्रपटाचं संगीत प्रकाशन
SHARES

एखाद्या सिनेमाच्या कार्यक्रमाला नेते मंडळींची उपस्थिती लाभली की त्या सिनेमाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. काहीतरी भन्नाट असल्याशिवाय राजकारण्यांची गर्दी होणार नाही असं मानलं जातं. ‘पाटील’ या मराठी सिनेमाच्या संगीत प्रकाशन सोहळ्याला नेते मंडळींनी गर्दी केल्याने या सिनेमात नेमकं काय दडलंय याबाबत कुतूहल वाढलं आहे.


जिद्दी युवकाचा संघर्ष

समाजातील दाहक वास्तवावर प्रकाशझोत टाकणाऱ्या चित्रपटांना प्रेक्षकांनी नेहमीच चांगला प्रतिसाद दिला आहे. अशाच एका जिद्दी युवकाच्या संघर्षाचा वेध घेणाऱ्या ‘पाटील’ या मराठी चित्रपटाचा म्युझिक लॉन्च सोहळा नुकताच महाराष्ट्राचे महसूल, मदत-पुनर्वसन आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. याप्रसंगी श्रीकांत भारतीय (मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी), आमदार प्रसाद लाड, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार रामराव वडकुते, कोकण आयुक्त डॉ. जगदीश पाटील, स्वाती खोपकर, पांडुरंग लोलगे, रुपेश टाक, सतीश गोविंदवार, अर्चना लोलगे, जयशील मिजगर आदी मान्यवर उपस्थित होते.


२६ ऑक्टोबरला प्रदर्शित

साधं राहणीमान असलेल्या दिग्दर्शक संतोष राममीना मिजगर यांच्या आजवरच्या प्रयत्नांचं कौतुक करताना ‘पाटील’ चित्रपटाला चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. स्टार क्राफ्ट मनोरंजन प्रा.लि. सचिकेत प्रोडक्शन्स, शौभम सिनेव्हिजन्स प्रा.लि निर्मित ‘पाटील : ध्यास स्वप्नांचा’ हा चित्रपट २६ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मनोरंजक मूल्यांचा समावेश करत ‘पाटील’ चित्रपटातील प्रेरणादायी कथानकाला योग्य अशा गीत संगीताची जोड देण्यात आली आहे.


पाच गाणी 

चित्रपटात एकूण पाच गाणी आहेत. यातील ‘पाटील पाटील...’ हे गाणं आनंद शिंदे, आदर्श शिंदे यांनी गायलं असून ‘तुला पाहून...’ हे रोमँटिक गीत बिष्णू मोहन, बेला शेंडे यांच्या गायकीने खुललं आहे. ‘सूर्य थांबला...’ या गीताला सुखविंदर सिंग व रेहा विवेक यांचा स्वर लाभला आहे. ‘राधेला पाहून...’ व ‘धिन ताक धिन...’ या ठेका धरायला लावणाऱ्या गीतांना गणपत मिजगर, बाबुल सुप्रियो, श्रेया घोषाल यांच्या आवाजात स्वरबद्ध केलं गेलं आहे. गीतं गुरु ठाकूर, समीर, सुरेश पांडा-जाफर, संजय वारंग, एस. आर. एम. यांनी शब्दबद्ध केली असून, संगीत आनंद-मिलिंद, सोनाली-उदय, प्रभाकर नरवाडे, डी. एच. हारमोनी, एस. आर. एम. एलियन यांनी दिलं आहे. पार्श्वसंगीत अमर मोहिले यांचं आहे.


विशेष भूमिकेत कोकण आयुक्त

शिवाजी लोटन पाटील, वर्षा दांदळे, भाग्यश्री मोटे, नरेंद्र देशमुख, प्रतिमा देशपांडे, सुरेश पिल्ले, कपिल कांबळे एस.आर.एम एलियन, यश आदी कलाकारांच्या या चित्रपटात भूमिका आहेत. विशेष भूमिकेत डॉ. जगदीश पाटील (कोकण आयुक्त) दिसणार आहेत. कथा, पटकथा आणि दिग्दर्शन संतोष मिजगर यांचं आहे. निलेश गावंड, मनीष शिर्के यांचं संकलन, तर छायांकन सुधाकर रेड्डी यकांती, राजा यांचं आहे. ध्वनी अनिरुद्ध काळे, तर व्हीएफएक्सची जबाबदारी प्रशांत मेहता यांनी सांभाळली आहे.



हेही वाचा -

कोई नहीं चलाता और तीर चल रहे हैं..

'या' नेत्याचा मुलगा बनला अभिनेता!



 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा