Advertisement

'या' नेत्याचा मुलगा बनला अभिनेता!


'या' नेत्याचा मुलगा बनला अभिनेता!
SHARES

राजकारणात असूनही शीघ्रकाव्यरचना आणि अनोख्या ड्रेसिंग शैलीमुळे अधिक चर्चेत राहणारे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा मुलगा जीतची पावलं सिनेसृष्टीकडे वळली आहेत. जीतची भूमिका असलेल्या ‘सोन्या’ या आगामी मराठी सिनेमाचा मुहूर्त रामदास आठवलेंच्या उपस्थितीत नुकताच पार पडला.


क्रिकेट टीमची कथा

सिद्धार्थ एंटरप्राइजेज आणि अंजली एंटरप्राइजेजद्वारा प्रस्तुत ‘सोन्या’चा मुहूर्त बोरीवली इथल्या बे व्यू बेनक्वेट हॉलमध्ये चित्रपटातील कलाकार-तंत्रज्ञांच्या उपस्थितीत संपन्न झाला.या सिनेमाचं दिग्दर्शन मुरली लालवाणी करणार आहेत. या चित्रपटात अंडर १४ क्रिकेट टीमची कथा असून, जीतच्या आईची भूमिका अभिनेत्री निशा परूळेकर साकारत आहे.आनंदाची बाब 

आठवले यांनी क्लॅप दिल्यानंतर अधिकृतपणे या सिनेमाचं चित्रीकरण सुरू करण्यात आलं. यावेळी बोलताना आठवले म्हणाले कि, मी नेता असलो तरी माझा मुलगा अभिनेता बनला आहे. ही फारच सुखद आणि आनंदाची बाब आहे. जीतला फिल्मी दुनियेतील एंट्रीबद्दल आणि ‘सोन्या’ सिनेमाच्या टिमला पुढील वाटचालीसाठी आठवले यांनी शुभेच्छाही दिल्या.


कर्तबगार आई 

छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंत विविध प्रकारच्या भूमिका साकारणाऱ्या निशानंही यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या. निशा म्हणाली कि, यापूर्वी मी बऱ्याचदा आई साकारली असली तरी ‘सोन्या’मधील आई खूप वेगळी आहे. ही एक सशक्त, कर्तबगार आई आहे. आपल्या मुलाचं क्रिकेटमध्ये करियर घडविण्यासाठी भरपूर कष्ट घेणारी आहे. स्वत:हालअपेष्टा सहन करून मुलाचं स्वप्न साकार करण्यासाठी धडपडणारी आहे.हेही वाचा -

महेश मांजरेकरांनी साधली दिग्गजांना एकत्र आणण्याची किमया

अमेरिकेतील मराठमोळ्या इंजिनीअरची मराठी सिनेसृष्टीत एंट्री
संबंधित विषय
Advertisement