Advertisement

नवाजुद्दीन म्हणाला, २० वर्षांनी माझी 'खुजली' मिटली

नवाजुद्दिन सिद्दीकी सारख्या प्रसिद्ध अभिनेत्याचं इंडस्ट्रीतील स्वप्नंही एक-दोन नव्हे तर तब्बल २० वर्षांनी पूर्ण झालं आहे.

नवाजुद्दीन म्हणाला, २० वर्षांनी माझी 'खुजली' मिटली
SHARES

आपण स्टार व्हावं, फिल्ममध्ये झळकावं असं स्वप्नं बघून अनेक नवोदित कलाकार मुंबईत येतात. पण फिल्मी इंडस्ट्रीत यशाच्या शिखरावर पोहोचणे इतकं सोपं नाही. कित्येकांना यश मिळतं. तर काहींच्या हाती अपयश लागतं. बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी देखील आयुष्यातील खडतर प्रवास ट्विटच्या माध्यमातून मांडला आहे.  

नवाजुद्दिन सिद्दीकी सारख्या प्रसिद्ध अभिनेत्याचं इंडस्ट्रीतील स्वप्नंही एक-दोन नव्हे तर तब्बल २० वर्षांनी पूर्ण झालं आहे. नवाजुद्दिन सिद्दीकीनं ट्वीटरवर आपला इंडस्ट्रीतील स्ट्रगलचा अनुभव शेअर केला आहे. त्याचा खुजलीचा एक किस्सा एक त्यानं सांगितला आहे. नवाझुद्दीनची ही खुजली म्हणजे प्रसिद्ध दिग्दर्शक सुधीर मिश्रा यांना भेटण्याचं स्वप्नं.

नवाजुद्दीन म्हणाला की, "२००० साली 'कलकत्ता मेल'च्या शूटिंगदरम्यानची ही गोष्ट. अखेर एका सहाय्यक दिग्दर्शकानं मला प्रसिद्ध दिग्दर्शक सुधीर मिश्रा यांनी भेटवून देण्याचं आश्वासन दिलं. सहाय्यक दिग्दर्शकानं मला सेटवर बोलावलं. मात्र मी हात वर करेन तेव्हाच तू भेटायला ये असं त्यांनी सांगितलं. त्यानुसार मी सेटवर पोहोचलो. मी दूर एका गर्दीत उभा होतो. कधी एकदा सहाय्यक दिग्दर्शक हात वर करतो आणि मी मिश्रा यांना भेटतो याची उत्सुकता मला होती. त्याचीच वाट मी पाहत होतो"

"जवळपास एका तासानं त्या सहाय्यक दिग्दर्शकानं हात वर केला. मी इतक्या गर्दीतून मार्ग काढत त्या सहाय्यक दिग्दर्शकापर्यंत पोहोचलो. त्यांनी मला पाहिलं आणि विचारलं 'काय आहे?' मी म्हणालो, 'तुम्ही म्हणाला होता ना की हात वर केल्यावर ये. मी आलो'.

मग तो सहाय्यक म्हणाला, 'अरे मला थोडी खाज आली होती म्हणून हात वर केला होता. तू पुन्हा तुझ्या जागेवर जा आणि मी हात वर करेन तेव्हाच ये' मी पुन्हा गर्दीत गेलो. आता हा सहाय्यक दिग्दर्शक हात खाजवण्यासाठी वर करतो की मला बोलावण्यासाठी याकडे माझे डोळे लागून राहिले होते"

"खूप वेळ मी वाट पाहिली मात्र ना त्या सहाय्यक दिग्दर्शकाचा हात वर झाला, नाही त्याला खाज आली. त्यानंतर ते आपल्या कामात व्यस्त झाले आणि मी नेहमीप्रमाणे मुंबईतल्या गर्दीत. या स्वप्नासह सहाय्यकानं आपले हात वर करून आपली खुजली तर घालवली. मात्र सुधीर मिश्रांना भेटण्याच्या माझ्या खुजलीचं काय? ती आता २० वर्षांनी मिटते आहे"



हेही वाचा

मुंबईत येते, कोणाच्या बापाची हिम्मत असेल तर रोखून दाखवा - कंगना

अमिताभ बच्चन यांच्यावर नेटिझन्स संतापले, सोनू सूदकडून शिकण्याचा दिला सल्ला

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा