मुक्ताचे 'रुद्रम' मधून छोट्या पडद्यावर पुनरागमन...

 Mumbai
मुक्ताचे 'रुद्रम' मधून छोट्या पडद्यावर पुनरागमन...
Mumbai  -  

काही दिवसांपूर्वी मुक्ता बर्वे हिने तिच्या सोशल प्रोफाइलवर एक व्हिडीओ शेअर केला होता, ज्यात ती 'तुम्हाला सत्य कळायलाच हवं...मी तुम्हाला सत्य सांगायलाच हवं'असं कॅमेऱ्यासमोर म्हणत आहे. त्यांनतर हा व्हिडीओ बराच व्हायरल झाला आणि निरनिराळे तर्कही लावले गेले. आता त्या व्हिडिओचा खरा अर्थ सापडला आहे. लवकरच मुक्ता प्रेक्षकांना ७ ऑगस्टपासून रोज भेटायला येणार आहे. आणि हा व्हिडीओ त्याचाच एक भाग आहे. 

झी युवा वाहिनीवर 'रुद्रम' नावाची एक नवीन मालिका सुरु होत आहे. त्यातूनच आपल्याला मुक्ता भेटायला येणार आहे. नात्यांच्या सुरक्षित चौकटीत, हसत खेळत आनंदी जीवन जगणाऱ्या व स्वतःचं कुटुंब हेच विश्व मानणाऱ्या सर्वसाधारण स्त्रीच्या आयुष्यात, जेव्हा एखादं अनपेक्षित वादळ येते, तेव्हा तिचं संपूर्ण आयुष्यच उध्वस्त होतं. आणि मग हीच सर्वसाधारण स्त्री, तिच्या भोवतालची सुरक्षित चौकट मोडून अन्यायाचा मागोवा घेते. एक अनपेक्षित अनुभव देणाऱ्या ‘ती'च्या प्रतिशोधाचा थरार म्हणजेच झी युवावर नवीन येणारी ही मालिका 'रुद्रम'.

'एका लग्नाची दुसरी गोष्ट' या मालिकेनंतर बऱ्याच वर्षांनी मुक्ता बर्वेपुन्हा छोट्या पडद्यावर पुनरागम करत आहे. 'रुद्रम' या मालिकेत तिच्यासोबत वंदना गुप्ते, सतीश राजवाडे, मोहन आगाशे, संदीप पाठक, किरण करमरकर, मिताली जगताप, सुहास पळशीकर, विवेक लागू, सुहास शिरसाट, सई रानडे, अनिरुद्ध जोशी, मिलिंद फाटक, सुनील अभ्यंकर, आनंद अलकुंटे, किरण खोजे, आशिष कुलकर्णी आणि अशा उत्तमोत्तम नामांकित कलाकारांची मांदियाळी असणार आहे. त्यामुळेच रसिकांसाठी ही मालिका एक मेजवानी ठरणार आहे. 'रुद्रम'मालिका झी युवावर ७ ऑगस्टपासून सोमवार ते शुक्रवार रोज रात्री ९.३० वाजता प्रसारित होणार आहे.हेही वाचा

हृतिक रोशन झळकणार मराठी सिनेमात


Loading Comments