Advertisement

कोण बनणार 'महाराष्ट्राचा फेव्हरेट'?

'महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण?' या पुरस्कारांसाठी एकूण १२ विभागांमध्ये नामांकन जाहीर झालं असून, फेव्हरेट चित्रपट, फेव्हरेट अभिनेता, फेव्हरेट अभिनेत्री, फेव्हरेट स्टाईल आयकॉन, फेव्हरेट पॉप्युलर फेस ऑफ द इयर, फेव्हरेट गीत या विविध विभागात कमालीची चढाओढ पाहायला मिळणार आहे.

कोण बनणार 'महाराष्ट्राचा फेव्हरेट'?
SHARES

दरवर्षाप्रमाणे यंदाही झी टॉकीजच्या वतीने 'महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण २०१८' या पुरस्कार सोहळ्याची नामांकनं घोषित करण्यात आली आहेत. 'महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण?' हा मराठी सिनेसृष्टीतील एकमेव व्युव्हर्स चॉईस अॅवॉर्ड सोहळा आहे. यंदाचं हे पुरस्काराचं नववं वर्ष असून, या पुरस्कारांनी नेहमीच नवोदित कलाकार आणि त्याच्या टॅलेंटला वाव दिलं आहे.


१२ विभागांमध्ये नामांकन 

'महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण?' या पुरस्कारांसाठी एकूण १२ विभागांमध्ये नामांकन जाहीर झालं असून, फेव्हरेट चित्रपट, फेव्हरेट अभिनेता, फेव्हरेट अभिनेत्री, फेव्हरेट स्टाईल आयकॉन, फेव्हरेट पॉप्युलर फेस ऑफ द इयर, फेव्हरेट गीत या विविध विभागात कमालीची चढाओढ पाहायला मिळणार आहे. मराठी चित्रपटांचे चाहते २५ जानेवारीपर्यंत या पुरस्कार सोहळ्यात आपल्या लाडक्या कलाकारांना पुरस्कृत करण्यासाठी आपलं मत नोंदवू शकतात.


चुरशीचा सामना

फेव्हरेट चित्रपट या विभागात वेगवेगळ्या शैलीचे तसेच समीक्षकांकडून कौतुकाची थाप मिळालेल्या चित्रपटांचा समावेश आहे. या पुरस्कारासाठी 'येरे येरे पैसा', 'बॉईज २', 'फर्जंद', 'नाळ', 'मुळशी पॅटर्न' आणि 'बबन' या चित्रपटांमध्ये चुरशीचा सामना रंगणार आहे. २०१८ मध्ये आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनात घर केलेल्या कलाकारांचा फेव्हरेट अभिनेता आणि फेव्हरेट अभिनेत्री या विभागात समावेश करण्यात आला आहे. 


अप्रतिम अभिनय

'पुष्पक विमान' या चित्रपटातील अप्रतिम अभिनयासाठी सुबोध भावे याने फेव्हरेट अभिनेता या विभागात नामांकन पटकावलं आहे. त्याचबरोबर 'मुळशी पॅटर्न' चित्रपटातील कमाल अभिनयासाठी ओम भुतकर, 'नाळ' मधील सहज सादरीकरणासाठी श्रीनिवास पोकळे, 'बबन'मधील उत्कृष्ट कामगिरीसाठी भाऊसाहेब शिंदे आणि 'बॉईज २' चित्रपटात प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करण्यासाठी पार्थ भालेराव यांना या विभागात नामांकनं मिळाली आहेत.


फेव्हरेट अभिनेत्री

फेव्हरेट अभिनेत्री या विभागात माधुरी दीक्षितची 'बकेट लिस्ट'मधील भूमिका नामांकनं पटकावून गेली, तसंच सोनाली कुलकर्णीच्या 'गुलाबजाम'मधील प्रेरक कलाकृती, तेजस्विनी पंडितची 'येरे येरे पैसा'मधील अफलातून कामगिरी, कल्याणी मुळे हिचा 'न्यूड'मधील उत्कृष्ट अभिनय, 'फर्जंद'मधील मृण्मयीने सादर केलेली अप्रतिम भूमिका आणि 'नाळ'मधील गोड देविका दफ्तारदार यांनी देखील या विभागात नामांकनं पटकावली आहेत. फेव्हरेट गीत या विभागात 'येरे येरे पैसा'मधील 'खंडाळा घाट...' आणि 'टायटल ट्रॅक...', 'बॉईज २' चित्रपटातील 'गोटी सोडा...', 'मुळशी पॅटर्न' या चित्रपाटातील 'अरारारा...', 'रेडू'मधील 'देवाक काळजी रे...', तसंच 'नाळ'मधील 'जाऊ दे न व...' या गाण्याचा समावेश आहे.


फेव्हरेट स्टाईल आयकॉन 

मराठी सिनेसृष्टीतील अभिनेते अंकुश चौधरी, अमेय वाघ, ललित प्रभाकर, सिद्धार्थ चांदेकर, उमेश कामात आणि स्वप्नील जोशी यांनी महाराष्ट्राचा फेव्हरेट स्टाईल आयकॉन या विभागात नामांकन आहे. अभिनेत्री सई  ताम्हणकर, मिथिला पालकर, मृणाल ठाकूर, वैदेही परशुरामी, सोनाली कुलकर्णी आणि मृण्मयी देशपांडे यांनी फेव्हरेट पॉप्युलर फेस ऑफ द इयर या विभागात नामांकन मिळवलं आहे.

याशिवाय फेव्हरेट दिग्दर्शक संजय जाधव, दिग्पाल लांजेकर, विशाल देवरुखकर, सुधाकर यक्कंटी, प्रवीण तरडे, भाऊराव कऱ्हाडे यांना सहाय्यक अभिनेता विभागात दिलीप प्रभावळकर, सिद्धार्थ जाधव, संजय नार्वेकर, नागराज मंजुळे, उपेंद्र लिमये, मोहन जोशी, सहाय्यक अभिनेत्री विभागात छाया कदम, गौरी किरण, मृणाल कुलकर्णी, स्पृहा जोशी, मुक्ता बर्वे, विशाखा सुभेदार यांच्या नावांचा समावेश आहे.


फेव्हरेट खलनायक

फेव्हरेट खलनायकांच्या यादीत प्रवीण तरडे, देवेंद्र गायकवाड, मनोज जोशी, ओंकार भोजने यांचा समावेश आहे. फेव्हरेट गायकांमध्ये प्रवीण कुंवर, जयस कुमार, आदर्श शिंदे, अजय गोगावले, आदर्श शिंदे-रोहित राऊत, अवधूत गुप्ते यांची नावं आहेत. जान्हवी प्रभू-अरोरा, वैशाली (माडे ऊन ऊन... - मुळशी पॅटर्न व वेगळ्या वाटा... - आम्ही दोघी), वैशाली सामंत, श्रेया घोषाल-साधना सरगम,  अंकिता जोशी-आनंदी जोशी या गायिकेंची नावं फेव्हरेट गायिकांसाठी नामांकनाच्या यादीत आहेत. यापैकी कोण महाराष्ट्राचा फेव्हरेट आहे ते लवकरच समजेल.

https://zeetalkies.zee5.com/mfk2018/ या संकेतस्थळावर जाऊन प्रेक्षक आपल्या फेव्हरेट कलाकाराला विजयी करण्यासाठी मत नोंदवू शकतात.



हेही वाचा - 

राकेश रोशन यांना कॅन्सरचं निदान

देशपांडेंसोबत 'पंचविशीत' परतणार संजय!




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा