ओम पुरींचा माफीनामा

Pali Hill
ओम पुरींचा माफीनामा
ओम पुरींचा माफीनामा
See all
मुंबई  -  

मुंबई - उरी येय़ील दहशतवादी हल्ल्याबाबत बोलताना ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांची जीभ घसरली आहे. "जवानांना सैन्यात जायला आम्ही सांगितले होते का? असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले आहे. मात्र या वक्तव्यावरून टीकेची झोड उठल्यावर त्यांनी माफी मागत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.

ओम पुरी सोमवारी एका वृत्तवाहिनीवरील चर्चेत सहभागी झाले होते. त्यावेळी पाकिस्तानी कलाकारांबाबत विचारलेल्या प्रश्नावरून ते खवळले. पाकिस्तानी कलाकार व्हिसा घेऊन भारतात येतात, असे सांगत त्यांनी पाकिस्तानी कलाकारांची बाजू घेतली. त्यानंतर दहशतवादी हल्ल्यानंतरही पाकिस्तानी कलाकरांची बाजू का घेता ? असा प्रश्न विचारण्यात आल्यावर ओम पुरी भडकले. "जवानांना सैन्यात जायला आम्ही सांगितले होते का ? त्यांना शस्त्र उचलण्यास कोणी सांगितले?" असे ते बरळले. मात्र ते एवढ्यावरच थांबले नाहीत. "15 ते 20 लोकांचे आत्मघाती पथक तयार करा आणि पाकिस्तानला पाठवून स्फोट घडवून आणा", असा फुकटचा सल्लाही त्यांनी देऊन टाकला.
दरम्यान, ओम पुरी यांच्या वक्तव्यावर सोशल मीडियावरून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. बॉलिवूडमधूनही त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. अभिनेते परेश रावल आणि अनुपम खेर यांनी पुरींच्या वक्तव्याबाबत खेद व्यक्त केला आहे. तसेच अंधेरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.