Advertisement

‘बिग बॉस’मध्ये ‘मस्ती की पाठशाला


‘बिग बॉस’मध्ये ‘मस्ती की पाठशाला
SHARES

कलर्स मराठीवरील ‘बिग बॉस’ मराठीचं पहिलं पर्व आता अंतिम टप्प्यात पोहोचलं आहे. बिग बॅासच्या घरामधून रेशम टिपणीस बाहेर पडली आहे. बिग बॉस यांनी दिलेल्या विशेष अधिकारानुसार रेशमनं आस्तादला या आठवड्यामधील नॉमिनेशनमधून वाचविलं आणि त्यामुळे पुष्करबरोबर आता आस्ताददेखील बिग बॉसच्या पहिल्या पर्वाच्या अंतिम फेरीत पोहचला आहे. सोमवारी बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काही सदस्य विद्यार्थी, तर काही सदस्य शिक्षकाच्या भूमिकेमध्ये दिसणार आहेत.


सई, आस्ताद शिक्षक 

सोमवारी बिग बॉसमध्ये एक अनोखा टास्क रंगणार आहे. अंदाजे तीन महिने एकत्र राहिल्यानंतर प्रत्येकजण एकमेकांकडून काही ना काही शिकले आहेत. शाळेप्रमाणेच इथंही बिग बॅासमधील सदस्य नवनवीन गोष्टी शिकले आहेत. शाळा म्हटलं की, वर्गामध्ये दबदबा असलेला मॅानिटर, पहिल्या बाकावर बसणारी हुशार मुलं, शेवटच्या बेंचवर बसून दंगा घालणारी मुलं असे नानाविध प्रकारचे विद्यार्थी असतात.  बिग बॉस घरातील सदस्यांना ‘मस्ती कि पाठशाला’ हे कार्य सोपवणार आहेत. या टास्कमध्ये सदस्य बरीच धम्माल मस्ती करणार आहेत हे नक्की. यामध्ये सई, आस्ताद शिक्षक बनणार अाहेत.


अंतिम सोहळ्यासाठी सदस्य निवड

रविवारी बिग बॉसच्या विकेंड डावामध्ये महेश मांजरेकर यांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक सदस्याला  त्याच्यासोबत अंतिम सोहळ्यामध्ये बघायची इच्छा असलेल्या एका सदस्याला निवडायचं होतं. शर्मिष्ठाने मेघा, तर मेघाने शर्मिष्ठाला, आस्तादने स्मिताला, स्मिताने रेशमला, रेशमने शर्मिष्ठाला निवडलं. सईने पुष्करला, तर पुष्करने मेघाला निवडलं. ज्यावरून मेघावर सई आणि पुष्कर नाराज होणार आहेत. कारण मेघानं शर्मिष्ठाचं नाव घेतलं. पण, यावर मेघाचं म्हणणं असणार आहे की, पुष्कर आणि सई माझं नाव कधीच घेत नाहीत आणि ही गोष्ट मेघाने शर्मिष्ठाजवळ शेअर केली जी तिलादेखील पटली.



हेही वाचा - 

आजारानंतरचा इरफानचा पहिला फोटो व्हायरल

पुष्कर ठरला पहिल्या सिझनचा शेवटचा कॅप्टन




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा