Advertisement

पुष्कर ठरला पहिल्या सिझनचा शेवटचा कॅप्टन

पुष्कर येणाऱ्या आठवड्याच्या नॉमिनेशन प्रक्रियेमधून देखील सुरक्षित झाला आणि बिग बॉस मराठीच्या पहिल्या सिझनचा शेवटचा कॅप्टन होण्याचा मान त्याला मिळाल्याचं बिग बॉसने घोषित केलं. शनिवार विकेंडचा डावमध्ये काय होणार? कोण घराबाहेर पडणार? कोणाला प्रेक्षक सुरक्षित करणार? हे बघायला मिळेल.

पुष्कर ठरला पहिल्या सिझनचा शेवटचा कॅप्टन
SHARES

कलर्स मराठीवरील ‘बिग बॉस’ मराठीच्या घरामधील सदस्यांना शुक्रवारी बिग बॉसने सुरेख सरप्राईझ दिलं. गेल्या आठवड्यात झालेल्या विकेंडच्या डावात सदस्यांनी केलेल्या आग्रहाखातर महेश मांजरेकरांनी मी नक्कीच एक दिवस घरामध्ये येईन, असं सांगितलं होतं. त्यानुसार महेश मांजरेकर त्यांच्या पत्नीसोबत घरात आले. घरातील सगळे सदस्य दोघांना पाहून आनंदित झाले.


पुष्करचं नाव

मेधा मांजरेकर यांनी सदस्यांसाठी घरून काही गोष्टी बनवून आणल्या होत्या. शुक्रवारी बिग बॉसने महेश मांजरेकरांच्या साक्षीने ‘टिकीट टू फिनाले’ हे कार्य पार पडेल असं घोषित केलं होतं. ज्यामध्ये स्मिता, सई, पुष्कर आणि शर्मिष्ठा यांनी ‘टिकीट टू फिनाले’ कोणत्या सदस्याला मिळालं पाहिजे आणि का? हे मांजरेकर यांना सांगायचं होतं.


 

यामध्ये स्मितानं शर्मिष्ठाचं नाव घेतलं, तर शर्मिष्ठानं पुष्करचं. सईनं पुष्करचं नाव घेतलं, तर पुष्करनं सईचं नाव घेतलं. अशाप्रकारे ४ पैकी २ मत मिळाल्याने ‘टिकीट टू फिनाले’ हे बिग बॉसकडून रिटर्न गिफ्ट मिळालेला पुष्कर महाअंतिम फेरीत थेट पोहोचणारा पहिला सदस्य ठरला.



विकेंडच्या डावात काय ?

इतकंच नव्हे येणाऱ्या आठवड्याच्या नॉमिनेशन प्रक्रियेमधून देखील सुरक्षित झाला आणि बिग बॉस मराठीच्या पहिल्या सिझनचा शेवटचा कॅप्टन होण्याचा मान त्याला मिळाल्याचं बिग बॉसने घोषित केलं. शनिवार विकेंडचा डावमध्ये काय होणार? कोण घराबाहेर पडणार? कोणाला प्रेक्षक सुरक्षित करणार? हे बघायला मिळेल.


‘तेजोमय टी बल्ब’ टास्क

शनिवारी बिग बॉसमध्ये एक टास्क रंगणार आहे. घर तोजोमय व्हावं यासाठी बिग बॉस सदस्यांवर फिलिप्स प्रस्तुत ‘तेजोमय टीबल्ब’ हे कार्य सोपवणार आहेत. या कार्यासाठी घरामध्ये फिलिप्स टी बल्ब झोन बनविण्यात येणार आहे. या कार्यामध्ये कोण विजयी ठरेल हे सुद्धा पाहायला मिळणार आहे.



हेही वाचा-

'बिग बॅास'च्या घरात स्मिता घालणार का बिकीनी?

राजेश श्रृंगारपुरे खेळणार अाता गोट्या



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा