Advertisement

ठाकुर सज्जन सिंह फेम अभिनेते अनुपम श्याम ओझा यांचं निधन

ज्येष्ठ अभिनेते अनुपम श्याम यांनी 'मन की आवाज प्रतिज्ञा २' या शोमध्ये ठाकूर सज्जन सिंगची भूमिका निभावली होती.

ठाकुर सज्जन सिंह फेम अभिनेते अनुपम श्याम ओझा यांचं निधन
SHARES

बॉलिवूड आणि टीव्ही अभिनेते अनुपम श्याम (Veteran actor Anupam Shyam passes away ) यांचं निधन झालं आहे. ते ६३ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून अनुपम श्याम यांच्यावर मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. आज उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

ज्येष्ठ अभिनेते अनुपम श्याम (Anupam Shyam) यांनी 'मन की आवाज प्रतिज्ञा २' (Mann Kee Awaaz Pratigya 2) या शोमध्ये ठाकूर सज्जन सिंगची भूमिका निभावली होती. काही दिवसांपूर्वी त्यांना मूत्रपिंडाशी संबंधित आजार उद्भवला होता. त्यामुळे त्यांना मुंबईतील लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं.

त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचे अवयव निकामी झाले. त्यामुळे दोन दिवस ते व्हेंटिलेटरवर होते. रविवारी रात्री उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे टीव्ही इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे.

दुर्दैवीची बाब म्हणजे, अनुपम श्याम यांना मागील एका महिन्यापासून रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण, त्यांच्या उपचारासाठी अनुपम यांच्या भावानं इंडस्ट्रीतील लोकांकडे मदत मागितली होती. डायलिसिस झाल्यानंतर त्यांची तब्येत अचानक बिघडली. अनुपम श्याम हे गोरेगावमधील लाइफलाइन रुग्णालयात दाखल झाले होते.

अनुपम यांची गेल्या ६ महिन्यांपासून तब्येत खालावली होती. त्यांच्या मूत्रपिंडात संसर्ग झाला होता. ज्यामुळे त्यांना हिंदूजा रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. तेथे दीड महिन्यापर्यंत त्यांच्यावर उपचार सुरू होते.

त्यांना वारंवार डायलिसिस करण्याचा सल्ला देण्यात आला होता. डायलिसिसमध्ये खूप खर्च झाल्यामुळे त्यांनी आयुर्वेदिक उपचार करण्याचा निर्णय घेतला. मात्र, आयुर्वेदिक उपचाराचा काहीच उपयोग झाला नाही.

पण डायलिसिस न केल्यामुळे त्यांच्या छातीत पाणी जमा झालं होतं. त्यानंतर डायलिसिस पुन्हा सुरू केलं तेव्हा त्यांना बरं वाटतं होतं.

दरम्यानच्या काळात अनुपम श्याम यांच्या उपचारासाठी त्यांच्या कुटुंबानं इंडस्ट्रीतील लोकांकडे विशेषत: आमिर खान आणि सोनू सूदकडे मदत मागितली होती. मनोज वाजपेयीनं अनुपम श्याम यांना मदतीचा हात दिला होता. त्यानं एक लाख रुपयांची मदत दिली होती.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील अनुपम यांच्या उपचारासाठी आर्थिक मदत केली होती. अनुपम यांना किडनीच्या उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर उपचारांवर मोठा खर्च होत होता. त्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अनुपम श्याम यांच्या उपचारांसाठी २० लाख रुपयांची आर्थिक मदत केली होती.

अनुपम यांनी दस्तक, हजार चौरासी की मां, दुश्मन, सत्या, दिल से, जख्म, संघर्ष, लगान, नायक, शक्ति, पाप, जिज्ञासा, राज, वेलडन, अब्बा, वॉन्टेड, कजरारे और मुन्ना माइकल सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.



हेही वाचा

कौंटुंबिक हिंसाचाराप्रकरणी हनी सिंहच्या पत्नीनं भरपाई म्हणून मागितली 'इतकी' रक्कम

प्रियंका चोप्राच्या रेस्टॉरंटची अमेरिकेत चर्चा, भारतीय पदार्थांसोबत मुंबईच्या वडापावचीही क्रेझ

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा