Advertisement

रसिका आणि आदितीचा ‘यू अँड मी’


रसिका आणि आदितीचा ‘यू अँड मी’
SHARES

‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत कट कारस्थानं करून राधिकाच्या नवऱ्याला आपलासा करणारी शनाया आणि ईशा यांचा दोस्ताना सर्वश्रुत आहेच. पुन्हा एकदा या दोघी बदमाशियां करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. ‘यू अँड मी’ या नव्या व्हिडिओ अल्बमसाठी दोघी पुन्हा एकत्र आल्या आहेत.


अल्बम रसिकांच्या भेटीला

‘जरा सा कट्टा टाकू आता...’ असं म्हणत रसिका सुनील आणि आदिती द्रविड यांची मैत्री ‘यू अँड मी’ या अल्बमच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. दोघींचा हा नवाकोरा अल्बम लवकरच रसिकांच्या भेटीला येत असून, व्हिडिओ पॅलेसने या अल्बमची निर्मिती केली आहे.


'या' दोघींनी गायलं गाणं

या गाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे स्वत: आदितीने हे गाणं लिहिलं आहे. आदिती आणि रसिकानेच हे गाणं गायलं आहे. या अल्बमच्या निमित्ताने रसिकाची नवी ओळख प्रेक्षकांना होणार आहे. साई-पियुष यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं आहे. फुलवा खामकरने या गाण्याचं नृत्यदिग्दर्शन केलं आहे. लोणावळा येथे चित्रीत झालेल्या या एका गाण्यासाठी रसिका आणि आदिती यांनी १२ वेगवेगळे ड्रेस परिधान केले आहेत.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा