सक्षमचा 'पप्या राणे' हिट!

नुकत्याच कॅफे मराठीच्या 'पॅडेड की पुशप' या वेबसिरीजमध्येही सक्षमने अफलातून भूमिका साकारली होती. त्याने साकारलेला पप्या पहिल्याच व्हिडीओमध्ये प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. मराठी मुलांच्या घरातील पार्टी कशी असते हे यात विनोदी अंगाने दाखवण्यात आलं आहे.

SHARE

आजचा जमाना वेबसिरीजचा असल्याने सर्व आघाडीच्या कलाकारांना वेबसिरीजचे वेध लागले आहेत. अशात सक्षम कुलकर्णीसारखा यंग अॅक्टर कसा मागे राहील... त्यानेही पप्या राणे बनून डिजीटल विश्वात धुमाकूळ घातला आहे. 


नव्या भूमिकेमुळे चर्चेत 

सर्वांना परिचित असलेला अभिनेता सक्षम कुलकर्णी सध्या एका नव्या भूमिकेमुळे चर्चेत आहे. सक्षमने आजवर आपल्या अभिनयाच्या जोरावर सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. 'दे धक्का', 'पक पक पकाक', 'शिक्षणाच्या आयचा घो', 'झिपऱ्या' इत्यादी चित्रपटांतून त्याने आपला अभिनयाचा ठसा उमटवला आहे. सध्या कॅफे मराठीच्या 'एव्हरी मराठी हाऊस पार्टी एवर'मध्ये त्याने साकारलेला पप्या राणे मराठी प्रेक्षकांमध्ये चांगलाच लोकप्रिय झाला आहे.


घरी पार्टीला या

नुकत्याच कॅफे मराठीच्या 'पॅडेड की पुशप' या वेबसिरीजमध्येही सक्षमने अफलातून भूमिका साकारली होती. त्याने साकारलेला पप्या पहिल्याच व्हिडीओमध्ये प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. मराठी मुलांच्या घरातील पार्टी कशी असते हे यात विनोदी अंगाने दाखवण्यात आलं आहे. त्याची बोलण्याची शैली, हावभाव सर्व काही एकदम भन्नाट झालं आहे. सक्षमचे आई-वडील भल्या पहाटे दोन दिवसांसाठी गावी जातात. दोन दिवस आई-वडील घरात नसल्याने सक्षम लगेचच आपल्या मित्र आणि मैत्रिणींना फोन करून सांगतो की, माझे आईवडील दोन दिवसांसाठी बाहेर गेले आहेत. तर आज रात्री माझ्या घरी पार्टीला या, असं सांगून तो सगळ्यांना बोलावतो. 


गोंधळाची गंमत

आपल्या मित्रांना गरजेच्या वेळी ऑनलाईन पद्धतीने चांगली हॉटेल्स कशी शोधावी हे मोबाइल अॅपच्या माध्यमातून कसं शिकवतो तेही या वेबसिरीजमध्ये विनोदी अंगाने दाखवण्यात आलं आहे. सगळे मित्र-मैत्रिणी सक्षमच्या म्हणजे पप्याच्या घरात काय काय गोंधळ घालतात याचीच गंमत या व्हिडीओमध्ये बघायला मिळेल. या व्हिडीओचं दिग्दर्शन संदीप नवरे यांनी केलं आहे.हेही वाचा - 

चाॅकलेट बाॅय बनला अंडरवर्ल्ड डॉन

'ठाकरी' संवादामुळे टाॅलिवूड नाराज
संबंधित विषय
ताज्या बातम्या