'कुर्बानी' आणि 'दयावान' मधल्या मित्रांचा असाही मृत्यूयोग

 Mumbai
'कुर्बानी' आणि 'दयावान' मधल्या मित्रांचा असाही मृत्यूयोग

चित्रपटसृष्टीच्या झगमगाटाच्या जगात एकमेकांसाठी वाट्टेल ती 'कुर्बानी' देण्याची तयारी असलेल्या 'मैत्री'चे बंधही पहायला मिळतात. फिरोज खान आणि विनोद खन्ना यांची यारी याच जातकुळीतली. रुबाब, पडद्यावरचा सहज वावर, आवडीनिवडी, बिनधास्तपणा ही दोघांमधली साम्यस्थळं. विनोद खन्ना यांच्या 27 एप्रिल, 2017 या तारखेला झालेल्या निधनामुळे फिरोज खान आणि विनोद खन्ना यांच्यातल्या आणखी एका साम्यस्थळात भर पडली आहे. आठ वर्षांपू्र्वी, याच दिवशी म्हणजे 27 एप्रिल, 2009 रोजी फिरोज खान यांंचं निधन झालं होतं.  

शंकर-शंभू, कुर्बानी आणि दयावान या चित्रपटांमध्ये फिरोज खान आणि विनोद खन्ना यांनी एकत्र काम केलं होतं. पडद्याबाहेरचे हे जीवश्च कंठश्च मित्र पडद्यावरही हीच भूमिका जगले.  

अविस्मरणीय चित्रपट, सच्ची यारी आणि वेगवेगळ्या वर्षी एकाच दिवशी संपवलेला जीवनप्रवास या वैशिष्ट्यांमुळे फिरोज-विनोद ही जोडी चित्रपटरसिकांच्या स्मरणात राहील, हे निश्चित. 


आणखी वाचा

https://www.mumbailive.com/mr/entertainment/veteran-actor-vinod-khanna-passes-away-10954

https://www.mumbailive.com/mr/entertainment/top-10-incident-happens-in-life-of-vinod-khanna-10955


Loading Comments