समीर धर्माधिकारी साकारणार डॉन

तू तिथे असावे' या आगामी मराठी चित्रपटात समीरचा वेगळा अंदाज प्रेक्षकांना पहायला मिळेल. ७ डिसेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

SHARE

कधी हिंदीत, तर कधी मराठीत विविधांगी भूमिका साकारत आश्चर्याचे धक्के देणाऱ्या अभिनेता समीर धर्माधिकारीने नेहमीच आपल्या अभिनयाने सर्वांना चकीत केलं आहे. नायकाइतकाच त्याने साकारलेला खलनायकही लोकांना चांगलाच भावला आहे. आता पुन्हा एकदा तो खलनायकी रूपात प्रेक्षकांना भेटणार आहे.


रावडी लूक

अभिनेता समीर धर्माधिकारी यांनी आपल्या देखण्या व्यक्तिमत्वासोबतच आपल्या विविधांगी भूमिकांनी आजवर आपली वेगळी छाप उमटवली आहे. 'तू तिथे असावे' या आगामी मराठी चित्रपटात समीरचा वेगळा अंदाज प्रेक्षकांना पहायला मिळेल. बाबा भाई या 'डॉन'ची भूमिका समीरने या चित्रपटात साकारली आहे. यात समीर धर्माधिकारी यांचा रावडी लूक पहायला मिळत आहे. ७ डिसेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


वेगळी भूमिका

स्वत:ला डॅानच्या भूमिकेसाठी तयार करण्यासाठी समीरने चांगलीच मेहनत घेतली आहे. या भूमिकेबद्दल बोलताना समीर म्हणाला की, यात मी साकारलेला डॉन हा चांगल्याशी चांगला तर वाईटाशी वाईट वागणारा आहे. ग्रे शेड असलेली भूमिका साकारताना मेकअप, बॉडी लँग्वेज, फेशियल एक्स्प्रेशन्स या सगळ्यांकडे खास लक्ष द्यावं लागतं. भूमिका कोणत्याही प्रकारची असली, तरी ती चांगली व्हावी यासाठी मी नेहमी कष्ट घेतो. एकाच इमेजमध्ये अडकून पडायचं नसल्याने ही वेगळी भूमिका स्वीकारल्याचंही तो म्हणाला.


दिनेश अर्जुना यांचं संगीत 

या चित्रपटात समीरसोबत भूषण प्रधान, पल्लवी पाटील, मोहन जोशी, अरुण नलावडे, विजय पाटकर, जयवंत वाडकर, मास्टर तेजस पाटील, श्रीकांत वट्टमवार, अभिलाषा पाटील, विशाखा घुबे हे कलाकार आहेत. 'तू तिथे असावे' या चित्रपटाचे निर्माते गणेश पाटील व दिग्दर्शक संतोष गायकवाड आहेत. चित्रपटाची कथा आणि पटकथा आशिष विरकर यांनी लिहिली आहे. संवाद आशिष विरकर आणि दिपक अंगेवार यांचे आहेत. मंदार चोळकर, डॉ.श्रीकृष्ण राऊत, पार्वस जाधव या गीतकारांनी लिहिलेल्या गीतांना दिनेश अर्जुना यांचं संगीत लाभलं आहे.हेही वाचा - 

संयमी करणार ‘माऊली’चा जयघोष!

रोहितचं म्युझिकल बर्थडे गिफ्टसंबंधित विषय
ताज्या बातम्या

समीर धर्माधिकारी साकारणार डॉन
00:00
00:00