Advertisement

सिप्पी कॅम्पमध्ये समीर कोच्छर

डिजीटल विश्वात स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या समीर कोच्छरची आता सिप्पी कॅम्पमध्ये एंट्री झाली आहे. रोहन सिप्पींच्या आगामी वेब सिरीजमध्ये समीरच्या अभिनयाची झलक पहायला मिळणार आहे.

सिप्पी कॅम्पमध्ये समीर कोच्छर
SHARES

डिजीटल विश्वात स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या समीर कोच्छरची आता सिप्पी कॅम्पमध्ये एंट्री झाली आहे. रोहन सिप्पींच्या आगामी वेब सिरीजमध्ये समीरच्या अभिनयाची झलक पहायला मिळणार आहे.


समीर महत्त्वाच्या भूमिकेत

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रोहन सिप्पी सध्या आपल्या आगामी प्रोजेक्टकडे वळले आहेत. लवकरच ते एका वेब सिरीजच्या कामात बिझी होणार आहेत. या सिरीजची कास्टींग प्रोसेस सध्या सुरू आहे. कलाकारांच्या यादीतील पहिल्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं असून, हे नाव आहे समीर कोच्छर. यासाठी समीरला साईनही करण्यात आल्याचं समजतं. या वेब सिरीजमध्ये समीर एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

कौतुकाचा वर्षाव 

समीरची ही पहिलीज वेब सिरीज नाही. यापूर्वी त्यानं काही वेब सिरीजमध्ये साकारलेल्या व्यक्तिरेखांचं कौतुक करण्यात आलं आहे. फिल्ममेकर सुजॅाय घोष यांनी नेटफ्लीक्ससाठी बनवलेल्या 'टाइपरायटर'मध्ये समीरनं चांगलं काम केलं होतं. याखेरीज याखेरीज नवाजुद्दीन सिद्दीकी आणि सैफ अली खान यांच्यासोबत त्यानं 'सॅक्रेड गेम्स'मध्येही अभिनय केला आहे. यातील परफॅार्मंससाठी समीरवर कौतुकाचा वर्षाव झाला होता. याशिवाय त्यानं आणखी काही ओरिजनल सिरीज साईन केल्या आहेत.

वर्षाअखेरीस शूट सुरू

रोहन सिप्पींच्या सिरीजमध्ये समीर मुख्य भूमिका साकारणार आहे. यंदा वर्षाअखेरीस या वेब सिरीजचं शूट सुरू होणार आहे. यामधील समीरच्या भूमिकेबाबत अद्याप काहीही माहिती देण्यात आलेली नाही. या वेब सिरीजचा विषय आणि त्यातील समीरचं कॅरेक्टर खूप वेगळं असल्याचं समजतं. त्यामुळंच समीरला सध्या या वेब सिरीजचेच वेध लागले आहेत. या सिरीजचं शीर्षक अद्याप ठरलेलं नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.हेही वाचा  -

गणपती-गौरीसोबतचा 'पवित्र रिश्ता'

नेहा-पुष्कराजचा 'मीडियम स्पाइसी'
संबंधित विषय
Advertisement