शाहरुख खान अडचणीत? ईडीनं बजावलं समन्स

  Mumbai
  शाहरुख खान अडचणीत? ईडीनं बजावलं समन्स
  मुंबई  -  

  बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानवर अंमलबजावणी संचालनालयाची वक्र दृष्टी पडली असून ईडीने गुरुवारी त्याला समन्स बजावले आहेत. शाहरुखला 23 आॅगस्ट रोजी ईडीसमोर हजर राहण्याचे आदेशही या समन्समध्ये देण्यात आले आहे.


  का बजावली समन्स?

  इंडियन प्रिमियर लीगमध्ये शाहरुख खान कोलकाता नाईट रायडर्स या संघाचा मालक आहे. त्यामुळे हा संघ नाईट रायडर्स स्पोर्टस् प्रायव्हेट लिमिटेड कंपनीशी संलग्न आहे. मात्र, या कंपनीमार्फत पैशांच्या अफरा तफरीचा आरोप करत, ईडीने फेमा अंतर्गत याचा तपास करण्यास सुरुवात केली होती. शाहरुख आणि गौरी खान मालक असलेल्या नाईट रायडर्स स्पोर्टस् प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने माॅरिशिअस स्थित एका कंपनीला अतिशय कमी किंमतीत त्यांचे शेअर्स विकले होते.

  73 कोटी रुपयांचे हे शेअर्स विकल्याची माहिती ईडीला मिळताच, त्यांनी या चौकशीला सुरुवात केली होती. या चौकशीदरम्यान मार्च महिन्यात ईडीने शाहरुखसह गौरी आणि अभिनेत्री जुही चावला हिलादेखील कारणे दाखवा नोटीस बजावली होती. यानंतर आता 23 ऑगस्ट रोजी ईडीसमोर हजर राहण्याचे आदेश शाहरुख खानला देण्यात आले आहेत.  हेही वाचा -

  ...जेव्हा किंग खानला राग येतो


  डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

  मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

  (खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.