Advertisement

राज कुंद्रा प्रकरणावर अखेर शिल्पा शेट्टीनं सोडलं मौन, म्हणाली...

शिल्पानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे.

राज कुंद्रा प्रकरणावर अखेर शिल्पा शेट्टीनं सोडलं मौन, म्हणाली...
SHARES

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि बिझनेसमॅन राज कुंद्राला पॉर्नोग्राफीच्या आरोपांखाली १९ जुलैला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं अटक केली. आता तिनं एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत तिनं या सगळ्यांचा तिच्या आयुष्यावर काय परिणाम होत आहे ते सांगितलं. तसंच कोणतीही खोटी बातमी छापू नका अशी विनंतीही तिनं केली.

शिल्पानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. ‘गेले काही दिवस आमच्यासाठी आव्हानात्मक होते. अनेक अफवा आणि आरोप केले जात आहेत. माध्यमांनी आणि काही लोकांनी माझ्याविषयी अनेक अनावश्यक गोष्टी सांगितल्या आहेत. माझ्या कुटुंबाला ट्रोल करण्यात आलं, प्रश्न विचारले गेले. मी कोणतीही गोष्ट अजून बोलले नाही आणि या प्रकरणात मी हे करणं टाळत राहणार आहे कारण हे सगळं न्यायालयीन आहे, म्हणून माझं नाव घेऊन कोणतीही चुकीची विधान पसरवू नका,’ असं शिल्पा म्हणाली आहे.

पुढे शिल्पा म्हणाली, ‘एक कलाकार म्हणून, कधीही कोणत्या गोष्टीची तक्रार करू नका, कधीही कोणाला समजावून सांगू नका या तत्त्वज्ञानाचे मी पालन करते. या सगळ्या प्रकरणात माझा मुंबई पोलिस आणि भारतीय न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे.

एक कुटुंब म्हणून, मी तुम्हाला नम्रपणे विनंती करते, विशेषत: एक आई म्हणून, माझ्या मुलांसाठी आमच्या प्रायव्हसीचा आदर करा. सोबतच तुम्हाला याची विनंती करते की कोणतीही बातमी पूर्ण माहित नसेल तर त्यावर टिप्पणी करू नका. कायद्याचं पालन करणारी मी एक भारतीय नागरीक असून गेल्या २९ वर्षांपासून मेहनत करत आहे. लोकांनी आज पर्यंत माझ्यावर विश्वास ठेवला असून मी कोणालाही निराश केले नाही.’

पुढे शिल्पा म्हणाली की, ‘सगळ्यात महत्वाचं, मी सगळ्यांना विनंती करते की माझ्या कुटुंबाचा आणि माझ्या प्रायव्हसीच्या अधिकारांचा या वेळी आदर करा. आम्ही मीडिया ट्रायलचे पात्र नाही आहोत. सत्यमेव जयते!’

राज कुंद्राला अटक झाल्यानंतर शिल्पा शेट्टीसंदर्भात देखील बऱ्याच चर्चा झाल्या. शिल्पाला या सगळ्या विषयी माहित होते अशा चर्चा सुरु झाल्या होत्या. त्यानंतर शिल्पानं काही मीडिया ग्रुप्सवर खोट्या बातम्या पसरवल्याचा आरोप केला. यासाठी ती उच्च न्यायालयात देखील गेली होती.

पण, मुंबई पोलिसांच्या रिपोर्टवर आधारीत बातम्या या मानहानीकरक कशा असू शकतात? असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयानं शिल्पा शेट्टीला विचारला.

राज कुंद्रा यांच्या अटकेनंतर प्रसार माध्यमात येत असलेले शिल्पा शेट्टीचे नाव यामुळे आपली बदनामी (Defamation Case) होते, असा दावा शिल्पा शेट्टीनं न्यायालयात केला होता. यावरुन बराच वेळ न्यायालयात युक्तीवाद देखील झाला.

मात्र, तुम्ही एक सेलिब्रिटी आहात लोकांना तुमच्याबद्दल वाचायला आवडतं, म्हणून लिहिलं जातंय. तसंच तुमच्याशी संबंधीत काही घडतंय आणि त्याबद्दल जर लिहिले गेले असेल तर त्यांवर तुम्ही बंधने आणण्याची मागणी कशी काय करू शकता? असा उलट प्रश्नच न्यायालयानं शिल्पा शेट्टीला विचारला.हेही वाचा

अनुराग कश्यपची शॉर्ट फिल्म 'घोस्ट स्टोरीज' अडकली वादाच्या भोवऱ्यात

शिल्पा शेट्टी, राज कुंद्राला सेबीकडून ३ लाखांचा दंड

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा