Advertisement

२३ वर्षांनी एकत्र आले शिवाजी साटम आणि अलका कुबल

संगीत दिग्दर्शक डॉ. सलील कुलकर्णी यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या ‘वेडिंगचा शिनेमा’ या आगामी मराठी चित्रपटाची सगळीकडं जोरदार चर्चा आहे. मराठीतील आघाडीचे कलाकार या चित्रपटात असल्यानं सर्वांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. याच चित्रपटासाठी अलका कुबल आणि शिवाजी साटम पुन्हा एकदा एकत्र आले आहेत.

२३ वर्षांनी एकत्र आले शिवाजी साटम आणि अलका कुबल
SHARES

काही कलाकार एखाद्या चित्रपटात एकत्र आले की पुन: पुन्हा एकत्र येत अनोखा विक्रम घडवतात. काही कलाकारांच्या बाबतीत मात्र अगदी याउलट घडतं. एखाद्या चित्रपटात एकत्र दिसल्यानंतर ते आपापल्या कामांमध्ये इतके व्यग्र होतात की, त्यांना पुन्हा एकत्र काम करण्याचा योगच जुळून येत नाही. असंच काहीसं घडलेले शिवाजी साटम आणि अलका कुबल हे कलाकार तब्बल २३ वर्षांनी एकाच फ्रेममध्ये दिसणार आहेत.


आघाडीचे कलाकार 

मागील काही दिवसांपासून संगीत दिग्दर्शक डॉ. सलील कुलकर्णी यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या ‘वेडिंगचा शिनेमा’ या आगामी मराठी चित्रपटाची सगळीकडं जोरदार चर्चा आहे. मराठीतील आघाडीचे कलाकार या चित्रपटात असल्यानं सर्वांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. याच चित्रपटासाठी अलका कुबल आणि शिवाजी साटम पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. शिवाजी साटम आणि अलका कुबल या जोडीनं या चित्रपटात महत्वपूर्ण व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. 


अनोखी जुगलबंदी 

दोघेही मराठी सिनेसृष्टीतील तगडे कलाकार आहेत. शिवाजी साटम यांनी मराठीपासून हिंदीपर्यंत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंत आज त्यांचा फार मोठा चाहतावर्ग आहे. अलका कुबल यांनी नेहमीच स्त्रीप्रधान चित्रपटांत विविध व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. ‘माहेरची साडी’ हा अलका कुबल यांचा चित्रपट मराठी सिनेसृष्टीतील माइल स्टोन ठरला आहे. त्यामुळं अलका कुबल आणि शिवाजी साटम या दोन दिग्गज कलाकारांच्या अभिनयाची अनोखी जुगलबंदी ‘वेडींगचा शिनेमा’मध्ये प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.

 

१२ एप्रिलला प्रदर्शित 

शिवराज वायचळ आणि ऋचा इनामदार ही नवी कोरी जोडी या चित्रपटात मुख्य भूमिकेत असून, मुक्ता बर्वे, भाऊ कदम, प्रवीण तरडे, अश्विनी काळसेकर, संकर्षण कऱ्हाडे, प्राजक्ता हणमगर, योगिनी पोफळे या कलाकारांच्याही यात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपटाची कथा सलील यांनीच लिहिली असून, पटकथा, संवाद, संगीत आणि दिग्दर्शन या आघाड्यांवरही त्यांनी चतुरस्र कामगिरी बजावली आहे. १२ एप्रिलला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.



हेही वाचा -

बायको शोधणाऱ्या नवरदेवाची झलक पाहिली का?

'टकाटक' भूमिकेत प्रथमेश परब




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा