Advertisement

‘श्री गुरुदेव दत्त’ची शतकी वाटचाल

रसिकांच्या भेटीला नेहमीच नवनवीन धाटणीच्या मालिका येत असतात, पण त्यात धार्मिक मालिकांचं वेगळं स्थान असतं. यापैकीच एक असलेल्या ‘श्री गुरुदेव दत्त’ या मालिकेनं शतकी भागांची वाटचाल करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

‘श्री गुरुदेव दत्त’ची शतकी वाटचाल
SHARES

रसिकांच्या भेटीला नेहमीच नवनवीन धाटणीच्या मालिका येत असतात, पण त्यात धार्मिक मालिकांचं वेगळं स्थान असतं. यापैकीच एक असलेल्या ‘श्री गुरुदेव दत्त’ या मालिकेनं शतकी भागांची वाटचाल करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

 स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारीत होणाऱ्या ‘श्री गुरुदेव दत्त’ या मालिकेनं नुकतेच १०० भाग पूर्ण केले आहेत. यानिमित्तानं सेटवर केक कापून सेलिब्रेशन करण्यात आलं. या खास प्रसंगी मालिकेची संपूर्ण टीम, निर्माते दिपक देऊळकर आणि निशिगंधा वाड सेटवर उपस्थित होते. संपूर्ण टीमची मेहनत आणि प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच हे शक्य झाल्याची भावना दिपक देऊळकर आणि निशिगंधा वाड यांनी व्यक्त केली. शतकांपर्यंतची वाटचाल पूर्ण केल्यानंतर ‘श्री गुरुदेव दत्त’ या मालिकेत प्रेक्षकांना आणखी बऱ्याच घटना पहायला मिळणार आहेत. या घटनांच्या माध्यमातून दत्तगुरूंची महती वर्णन करण्यात येणार आहे.

‘श्री गुरुदेव दत्त’ या मालिकेत दत्तगुरुंची भूमिका साकारणाऱ्या मंदार जाधवनं १०० भागांचा टप्पा गाठल्याचा आनंद शब्दांमध्ये व्यक्त केला आहे. तो म्हणाला की, माझ्यासाठी हा खूप महत्वाचा आणि आनंदाचा दिवस आहे. आजवर केलेल्या मेहनतीचं फळ मिळत आहे. या मालिकेवर आणि माझ्यावर प्रेक्षक भरभरुन प्रेम करत आहेत. मालिकेबद्दलच्या प्रतिक्रिया आवर्जून कळवत आहेत. एक कलाकार म्हणून माझ्यासाठी हा भारावून टाकणारा अनुभव आहे. प्रेक्षकांचं हे प्रेम असंच कायम रहावं हीच इच्छा व्यक्त करेन अशी भावनाही मंदारनं व्यक्त केली.

या मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. शंभर भागांच्या या भक्तीमय सोहळ्यात दत्तगुरुंचा जन्मापासूनचा प्रवास पाहायला मिळाला आहे. मालिकेचा यापुढील प्रवासही तितकाच महत्त्वाचा आणि उत्कंठावर्धक असेल. दत्तांनी संगमभूमी म्हणजेच गाणगापूर शापमुक्त करण्यासाठी अखंड प्रयत्न केले. मात्र कर्णकुमाराच्या खोट्या जाळ्यात अडकलेली आणि भक्तीचा विसर पडलेली संगमभूमीची जनता श्री दत्तांनाच दोषी ठरवत त्यांना संगमभूमी सोडून जायला भाग पाडत आहे. कर्णकुमार श्री दत्तांच्या विरोधात त्यांच्या आई-वडिलांनाही उभं करण्याचा प्रयत्न करणार आहे. संगमभूमीतील जनतेला श्री दत्तांची महती कशी पटणार याची गोष्ट ‘श्री गुरुदेव दत्त’ मालिकेच्या पुढील भागांमध्ये पाहायला मिळणार आहे.



हेही वाचा -

लग्नापूर्वीच कल्की देणार गुड न्यूज

'मर्दानी २' चा दमदार टीझर प्रदर्शित, राणी मुखर्जीचा अॅक्शन धमाका




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा