Advertisement

बघा, बप्पीदांच्या वाढदिवसाला कोण कोण आलं?

बप्पी लाहिरी आणि त्यांच्या चाहत्यांसाठी त्यांचा वाढदिवस हे डबल सेलिब्रेशन ठरलं. निर्माते मंजू भारती यांनी यानिमित्ताने एका दिमाखदार सोहळ्याचं आयोजन केलं होतं. या सोहळ्यात बप्पीदांनी तबला आणि डग्ग्याच्या आकाराचा केक कापला.

बघा, बप्पीदांच्या वाढदिवसाला कोण कोण आलं?
SHARES

आपल्या अनोख्या गायन आणि संगीतशैलीसोबतच जीवनशैलीमुळेही आकर्षणाचं केंद्र बनलेले ज्येष्ठ संगीतकार बप्पी लाहिरी यांनी वयाची पासष्ठी आणि संगीतक्षेत्रातील हाफ सेंच्युरीचा प्रवास चित्रपटसृष्टीतील मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा केला. या दुर्मिळ योगाचं औचित्य साधत बप्पी यांनी चित्रपट दिग्दर्शनाच्या दिशेने वाटचालही सुरू केली आहे.


डबल सेलिब्रेशन

बप्पी लाहिरी आणि त्यांच्या चाहत्यांसाठी त्यांचा वाढदिवस हे डबल सेलिब्रेशन ठरलं. निर्माते मंजू भारती यांनी यानिमित्ताने एका दिमाखदार सोहळ्याचं आयोजन केलं होतं. या सोहळ्यात बप्पीदांनी तबला आणि डग्ग्याच्या आकाराचा केक कापला. या प्रसंगी मंजू भारती आणि मुकेश भारती यांनी 'एक अधुरा संगीत' या हिंदी चित्रपटाची घोषणा केली. विवेक फिल्म्स प्रोडक्शन हाऊसच्या बॅनरखाली तयार होणाऱ्या 'एक अधुरा संगीत' या चित्रपटाद्वारे बप्पीदा चित्रपट दिग्दर्शनाकडे वळत असल्याचंही त्यांनी यावेळी घोषित केलं. 


कोण कोण आलं?

जुहू येथील जे. डब्ल्यू. मेरिएट या पंचतारांकित हॅाटेलमध्ये पार पडलेल्या या सोहळ्याला चित्रपटसृष्टीतील व संगीत क्षेत्रातील खास व्यक्तींनी हजेरी लावली होती. यात ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र, गोविंदा, शत्रुघ्न सिन्हा, सोनू निगम, शर्बणी मुखर्जी, ललित पंडीत, जॅाय मुखर्जी, पहलाज निहवानी, कोमल नाहटा, योगेश लाखानी, ईला अरुण, अलका याज्ञिक, बी. सुभाष, किशोरी शहाणे, बॅाबी विज, जॅाली मुखर्जी, देब मुखर्जी, रोनू मुखर्जी आदी मान्यवरांचा समावेश होता.


मी परफाॅर्मर

याप्रसंगी आपल्या भावना व्यक्त करताना बप्पीदा म्हणाले की, मला कायम काम करायला आवडतं. मग ते गायन असो, गीतलेखन असो, संगीत देणं असो, परफॅार्म करणं असो वा दिग्दर्शन करणं... आता मी फिचर फिल्म दिग्दर्शित करणार असल्याने खूप उत्साहीत आहे. 'एक अधुरा संगीत' ही सुंदर अशी प्रेमकथा असेल, जी माझ्या चाहत्यांना नक्कीच आवडेल.हेही वाचा-

प्रिया-उमेशची गोड बातमी काय?

लोकांनी आम्हाला विकत घेतलंय : स्वप्नील-मुक्तासंबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा