Advertisement

गरजूंच्या मदतीसाठी सोनू सूदनं मालमत्ता ठेवली गहाण

गरजूंच्या मदतीसाठी सोनू सूदनं एक-दोन नव्हे तर आपल्या तब्बल ८ मालमत्ता गहाण ठेवल्या आहेत.

गरजूंच्या मदतीसाठी सोनू सूदनं मालमत्ता ठेवली गहाण
SHARES

लॉकडाऊनच्या काळात आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या लोकांसाठी अभिनेता सोनू सूदनं मदतीचा हात पुढे केला. त्याच्या या चांगल्या कामाचं कौतुकही झालं. पण यासाठी सोनूला आपली मालमत्ता गहाण ठेवावी लागल्याचं समोर येत आहे.

वृत्तानुसार, गरजूंच्या मदतीसाठी सोनू सूदनं एक-दोन नव्हे तर आपल्या तब्बल ८ मालमत्ता गहाण ठेवल्या आणि त्यातून त्यानं १० कोटींचं कर्ज घेतलं अशी माहिती समोर आली आहे. पण सोनूकडून याबाबतचा अद्याप कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही.

लॉकडाऊनच्या काळात लोकांच्या अडचणी पाहून अस्वस्थ झालेल्या सोनूनं त्याच्या एकूण आठ मालमत्ता गहाण ठेवल्या. त्यातून त्यानं १० कोटी रुपये उभे केले. मनी कंट्रोल या वेब पोर्टलनं याबाबतची माहिती दिली आहे. जुहू इथल्या पॉश आणि हायप्रोफाईल परिसरातील आपली दोन दुकाने आणि सहा फ्लॅट सोनूनं गहाण ठेवले आहेत.

ही दोन्ही दुकाने तळमजल्यावर आहेत. तर शिवसागर को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीत त्याचे फ्लॅट आहेत. ही सोसायटी इस्कॉन मंदिराजवळील ए. बी. नायर रोडवर आहे.

या आठ मालमत्ता गहाण ठेवून त्याबदल्यात त्यानं बँकेकडून १० कोटीचं कर्ज घेतलं आहे. दस्ताऐवजानुसार त्यानं १० कोटींचं कर्ज घेण्यासाठी पाच लाख रुपये नोंदणी शुल्कही भरले आहे. यातील काही मालमत्ता त्याची पत्नी सोनालीच्या नावावर असल्याचं सांगितलं जातंय.



हेही वाचा

अभिनेत्री क्रिती सेनॉनला कोरोनाची लागण

दाक्षिणात्य अभिनेत्री व्हीजे चित्राची आत्महत्या

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा