Advertisement

दाक्षिणात्य अभिनेत्री व्हीजे चित्राची आत्महत्या

दाक्षिणात्य अभिनेत्री २८ वर्षीय व्हीजे चित्रा हिने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चित्राने चेन्नईतील हॉटेलमध्ये गळफास घेऊन आयुष्य संपवलं.

दाक्षिणात्य अभिनेत्री व्हीजे चित्राची आत्महत्या
SHARES

दाक्षिणात्य अभिनेत्री २८ वर्षीय व्हीजे चित्रा हिने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चित्राने चेन्नईतील हॉटेलमध्ये गळफास घेऊन आयुष्य संपवलं. यामुळे मनोरंजन विश्वात मोठी खळबळ उडाली आहे. चित्राच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही.पोलीस याबाबत तपास करत आहेत. 

चेन्नईतील नसरप्रीत भागात असलेल्या हॉटेलमध्ये चित्रा थांबली होती. या हॉटेलमध्येच तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. विशेष म्हणजे तिचा काही दिवसांपूर्वी उद्योजक हेमंत रवी यांच्याशी साखरपुडा झाला होता. चित्रा नैराश्यात होती असं बोललं जात आहे. त्यातूनच तिने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र तिच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. धक्कादायक म्हणजे आत्महत्येच्या काही तास आधी तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट आणि स्टोरीही शेअर केली होती. 

चित्राने २०१३ मध्ये वयाच्या २१ व्या वर्षी अँकर म्हणून कारकीर्द सुरू केली. व्हीजे चित्रा म्हणून तिने मनोरंजन विश्वात नाव कमावलं. मन्नन मंगल मालिकेतून चित्राने मालिका विश्वात पाऊल ठेवले, तिने केलेल्या मोजक्या मालिकांपैकी वेलुनाची मालिकेतील तिची मुख्य भूमिका गाजली होती. तसेच विजय टीव्हीवर प्रसारित होत असलेल्या पेंडियन स्टोअर्स या प्रसिद्ध मालिकेतील भूमिकेमुळे चित्रा चांगलीच प्रसिद्धीला आली होती. 

ईव्हीपी फिल्म सिटीमधील शूटिंगनंतर चित्रा रात्री २.३० वाजता हॉटेलमध्ये परतली होती. ती हॉटेलमध्ये हेमंतसोबत राहत होती. हेमंत यांनी पोलिसांना सांगितलं की, हॉटेलवर आल्यानंतर चित्राने सांगितले की ती अंघोळीसाठी जात आहे. मात्र ती बराच वेळ झाला तरी बाहेर आली नाही. दरवाजा वाजवल्यानंतरही काहीच प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर हेमंतने हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना याबाबत माहिती दिली. डुप्लिकेट चावीने दरवाजा उघडला असता चित्राने गळफास घेतल्याचं आढळून आलं. 




Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा