Advertisement

दात दुखतानाही सुबोधने केलं शूट!

सुबोधच्या दातदुखीमुळे सिनेमाचं पूर्ण शूटींग वेळापत्रकच विस्कळीत होणार होतं. मात्र सुबोधने आपल्या दातामुळे सर्वांची गैरसोय करण्यापेक्षा शूट लवकर आटोपण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी दातदुखीचं कोणतेही चिन्ह चेहऱ्यावर न आणता, त्याने आपलं काम चोख करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला.

दात दुखतानाही सुबोधने केलं शूट!
SHARES

‘शो मस्ट गो आॅन’, असं म्हणत बऱ्याच कलाकारांनी दुखापत होऊन किंवा तब्बेत ठीक नसतानाही कॅमेरा फेस केल्याचं आपण नेहमीच ऐकतो. अभिनेता सुबोध भावेनेही कधीतरी असा अनुभव यापूर्वी घेतला असेल. पण ‘शुभ लग्न सावधान’ या सिनेमाचं शूटिंग त्याने दात दुखत असतानाही केल्याचा अनुभव त्याच्या कायम स्मरणात राहील.


दुबईत शूटींग

दातदुखीचा त्रास प्रत्येकाने कधी ना कधी सहन केलेला असेलच. दातदुखीच्या वेदना असह्य झाल्या तर कोणत्याच कामात लक्ष लागत नाही हा अनुभवही प्रत्येकाने घेतला असेल. अगदी त्याचा मुळापर्यंत उपचार केल्याशिवाय या वेदना थांबत नाहीत. असंच काहीसं दुबईत 'शुभ लग्न सावधान' चित्रपटाच्या शुटींगदरम्यान सुबोध भावेसोबत झालं होतं. त्याने दुबईतील एका दंतचिकित्सकाकडे तात्पुरते उपचारदेखील घेतले होते. पण त्याचं दुखणं काही थांबत नव्हतं.


गैरसोय टाळली

सुबोधच्या दातदुखीमुळे सिनेमाचं पूर्ण शूटींग वेळापत्रकच विस्कळीत होणार होतं. मात्र सुबोधने आपल्या दातामुळे सर्वांची गैरसोय करण्यापेक्षा शूट लवकर आटोपण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी दातदुखीचं कोणतेही चिन्ह चेहऱ्यावर न आणता, त्याने आपलं काम चोख करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. सिनेमाचे दिग्दर्शक समीर सुर्वे आणि कार्यकारी निर्माते अभय शेवडे यांनीदेखील त्याला साथ देत, सिनेमाचे चित्रीकरण नियोजित वेळेपेक्षा एक दिवस आधी पूर्ण करत, सुबोधला मोकळं केलं.


पुण्यात उपचार

दुबईतून भारतात परतल्यावर सुबोधने थेट पुणे गाठत आपल्या दुखऱ्या दातावर उपचार घेतले. सुबोधच्या या दातदुखीवर त्याने केलेली ही मात खरंच दाद देण्यासारखीच आहे. पल्लवी विनय जोशी निर्मित ‘शुभ लग्न सावधान’ हा सिनेमा १२ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, यात अभिनेत्री श्रुती मराठेसह इतरही कलाकारांच्या भूमिका आहेत.हेही वाचा -

नाहीतर, बिग बाॅस बंद पाडू- अमेय खोपकर

वाचाळ बडबड! नाना पाटेकरांची तनुश्रीला नोटीस

Exclusive : कॅामन मॅन रिअॅक्ट झाला तरच अॅथॅारिटीचे डोळे उघडतील : महेश मांजरेकर 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा