Advertisement

अॅक्शन फिल्म 'टाइगर जिंदा है'चा ट्रेलर रिलीज


अॅक्शन फिल्म 'टाइगर जिंदा है'चा ट्रेलर रिलीज
SHARES

बॉलिवूडमधला दबंग अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांचा आगामी अॅक्शन सिनेमा 'टाइगर जिंदा है' चा ट्रेलर मंगळवारी रिलीज झाला. सलमान खान या सिनेमात अॅक्शन हिरोच्या रुपात दिसणार आहे. या सिनेमाचे शूटिंग चार वेगवेगळ्या देशांमध्ये पार पडले.

The day you've been waiting for is here! #TigerZindaHaiTrailer OUT TODAY. @BeingSalmanKhan #KatrinaKaif @aliabbaszafar @TigerZindaHai pic.twitter.com/rdnQWnJQ2a

— Yash Raj Films (@yrf) November 7, 2017


'टायगर जिंदा है' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

यापूर्वी कबीर खान दिग्दर्शित 'एक था टाइगर' 2012 मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यानंतर आता त्याचा सिक्वल टायगर जिंदा है लवकरच रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ट्रेलर बघण्यासाठी इथे क्लिक करा -



हा सिनेमा 22 डिसेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. 'टाइगर जिंदा है' या सिनेमाकडून सलमानच्या खूप अपेक्षा आहेत. कारण त्याचा मागे प्रदर्शित झालेला सिनेमा ट्युबलाइटने बॉक्स ऑफिसवर तितकी कमाल केली नाही. तर कतरिनाचा यापूर्वी रिलीज झालेला 'जग्गा जासूस' या सिनेमाला देखील बॉक्‍स ऑफिसवर छाप पाडता आली नाही.



हेही वाचा - 

'टायगर जिंदा है'चं पहिलं पोस्टर रिलीज!


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा